‘क्या करते हो च्युत्यापन?’ यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी शिव्या देऊन केला पत्रकाराचा उद्धार

0
843
छायाचित्रः ट्विटरवरील व्हिडीओचा स्क्रीन शॉट

लखनऊः उत्तर प्रदेशचे ‘संन्यासी’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना लस घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना पत्रकाराला शिव्या देऊन उद्धार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. योगी आदित्यनाथ हे एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देत असताना पत्रकाराने त्यांना मध्येच सर एक मिनिट म्हणत मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी ‘क्या करते हो च्युत्यापन?’ अशा शिव्या देऊन त्या पत्रकाराचा उद्धार केला.

योगी आदित्यनाथ यांनी आज कोरोनाची लस घेतली. त्यांनी लस घेतल्यानंतर एका वृत्तसंस्थेचा पत्रकार लसीकरणाबाबत त्यांची प्रतिक्रिया घेत होता. योगी आदित्यनाथ यांची १७ सेकंद प्रतिक्रिया देऊन झाल्यानंतर प्रतिक्रिया घेणाऱ्य वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ‘सर एक मिनिट’ म्हणत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर योगी आदित्यनाथ चांगलेच भडकले आणि ‘क्या करते हो च्युत्यापन?’  अशी शिवी हासडून त्यांनी त्या पत्रकाराचा उद्धार केला.

त्या वृत्तसंस्थेने आधी योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिक्रियेचा २४ सेकंदांचा व्हिडीओ जसाच्या तसा जारी केला. परंतु या व्हिडीओत आपल्याच पत्रकाराला शिव्या देऊन उद्धार करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तो व्हिडीओ मागे घेण्यात आला आणि नवीन व्हिडीओ जारी करण्यात आला खरा, परंतु तोपर्यंत योगी आदित्यनाथ यांनी मीडियाला अर्पण केलेली ‘शब्दसुमने’ असलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पत्रकारांनी हा व्हिडीओ शेवटच्या सेकंदापर्यंत बघावा…योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांना वापरलेले अपशब्द ऐका… असे राष्ट्रवादी काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या व्हिडीओवरून आता वाद होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा