प्रकाश आंबेडकरांचा केस कापून लॉकडाऊनला विरोध, जनजीवन सुरळित करण्याचे केले आवाहन

0
342

अकोलाः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपुष्टात आणा आणि सामान्य जनजीवन सुरळित करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मी केस कापले. तुम्ही तुमचे व्यवहार सुरू करा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.

प्रकाश आंबेडकर हे सातत्याने लॉकडाऊन संपवण्याची मागणी करत आहेत. काल त्यांनी अकोल्यात नाव्ह्याकडे जाऊन केस कापून घेतले आणि सामान्य जनजीवन पुन्हा सुरू करा, असे आवाहन जनतेलाही केले आहे.

लॉकडाऊनमुळे सामान्य जनता विशेषतः मजूर, परंपरागत व्यापार करणाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम झाला आहे. सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुदा होऊ नका, असे आवाहन करत कोरोनामुळे दगावणाऱ्यांचे प्रमाण दोन टक्के असून अकारण भिण्याची गरज नाही. बुद्धाने म्हटल्याप्रमाणे जो जन्माला आला तो मरणारच आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचे कार्य हाती न घेतल्यास माणसे उपासमारीने मरतील. लॉकडाउन वाढवू नये, अशी मागणी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा