फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण नवरीच मिळेनाः प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

0
333
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्न करण्यासाठी उतावीळ झाले आहेत, पण त्यांना नवरीच मिळेना, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केली.

प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला सातत्याने विरोधाची भूमिका मांडली आहे. पाच टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केला. लोकांनी लॉकडाऊन तोडून आपले व्यवहार सुरळीत करावे, अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा मांडली.

प्रकाश आंबेडकर यांनी परवाच अकोल्यात नाव्ह्याकडे जाऊन केस कापून घेतले होते आणि लॉकडाऊनला विरोध केला होता. लॉकडाऊन असाच कायम राहिला तर लोक कोरोनापेक्षा जास्त उपासमारीने मरतील. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका कामगार, पारंपरिक व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यांना सरकारने मदत करावी, अशीही प्रकाश आंबेडकरांची मागणी आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून पुन्हा भाजपचे सरकार आणण्याचा प्रयत्न भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता, फडणवीस हे लग्न करण्यासाठी उतावीळ झालेले आहेत, पण त्यांना नवरीच मिळेना, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा