मोदींनीच भारतात कोरोना आणला म्हटले तर चुकले कुठे?: ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकरांचा सवाल

0
499
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपवून मोदी सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असतानाच देशातील कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोनाच्या या स्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले असून मोदींनीच भारतात कोरोना आणला म्हटले तर चुकले कुठे?, असा सवाल केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची, त्यांची कोरोना टेस्टिंग करण्याची गरज होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. असे असताना मोदीनींच भारतात कोरोना आणला म्हटले तर चुकले कुठे?,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लोकांनी लॉकडाऊन तोडून त्यांचे व्यवहार सुरळित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सर्वसामान्य जनता विशेषतः मजूर व परंपरागत व्यापार करणाऱ्यांवर लॉकडाऊनचा विपरित परिणाम झाला आहे. सरकारने त्यांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा