अमित ठाकरेंनाच हनुमान चालीसा म्हणायला लावा, बहुजन पोरांना नकोः सुजात आंबेडकरांचे आव्हान

0
437
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मशिदीवरचे भोंगे हटवा, नाही तर आम्ही मशिदीसमोर मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर लावून हनुमान चालीसा लावू, या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर अक्षरशः तुटून पडले. आधी तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणायला लावा, आमच्या बहुजन पोरांना नको. तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर उभा करू नका, अशा शब्दांत सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

शनिवारी शीवतीर्थावर झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढला होता. मशिदीवर लावलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पिकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी आज मुंबईत झालेल्या सभेत याच इशाऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

हेही वाचाः ‘स्क्रिप्ट भाजपची, भोंगा भाजपचा आणि टाळ्याही स्पॉन्सर… कालची सभा राज ठाकरेंची नव्हतीच!’

 काल कुणीतरी एक वक्तव्य केलेलं की जर मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणायला लावेन. माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा. फक्त एक गोष्ट आहे. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे. तिकडे हनुमान चालीसा म्हणायला जी कुणी जात आहेत, त्यांनी टीशर्ट काढून जाणवं दाखवावं आतमध्ये… मग हनुमान चालीसा म्हणा… एकही बहुजन माणूस नकोय मला…, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

माझी राज ठाकरेंना विनंती आहे की, ते स्पिकर लावण्यासाठी अमित ठाकरेंना पाठवा आणि आधी अमित ठाकरेंनाच हनुमान चालीसा म्हणायला लावा. घोषणा तुम्ही करणार आणि त्यात बहुजन कार्यकर्ता भरडणार. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दंगल झाली तर कुणायला पकडायचे हे पोलिसांना माहीत आहे, असा टोलाही सुजात आंबेडकर लगावला आहे.

 दुसरी गोष्ट.. राज साहेबांना ही कळकळीची विनंती आहे… तुम्ही शरद पवारांचा इंटरिव्ह्यू घ्या… तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा… पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर उभा करू नका, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, बऱ्याच दिवसांनंतर मी बोलत आहे. आपली ताकद काल होती तशीच आजही आहे. आपली ताकद कमी होणार नाही. माझ्या निवडणुकांपासून परिस्थिती बदलली आहे. आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल आण वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाणे गरजेचे आहे. लाटेवर जायचे नाही. कारण नरेंद्र मोदी सुद्धा लाटेवर प्रधानमंत्री झाले आहेत. मागच्या दोन निवडणुका लढताना हे लक्षात आले आहे की, आपण स्वबळावर निवडणुका लढू शकत नाही. त्यामुळे आता आपण आपला समाज सोडून इतर समाजाच्या लोकांना आपल्या पक्षाशी जोडायचे आहे, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा