एमआयएम- वंचितमधील फाटाफूटः ‘बडे भाई’ बाळासाहेबांवरील ओवेसींचे प्रेम असे कसे आटले?

3
716

प्रकाश आंबेडकरांप्रती महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याची हीच नामी संधी आहे, हे एमआयएमने बरोबर हेरले. मतदारसंघ मिळाला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील दलित, बहुजन, ओबीसी, धनगर अशा मतदारांनी एमआयएमच्या जलील यांना प्रकाश आंबेडकरांकडे पाहून डोळे झाकून मतदान केले. या मतदारसंघातील गंगापूरसारख्या तालुक्यात एमआयएमची शाखाही नसताना त्या तालुक्यातून एमआयएमला 50- 52 हजार मते मिळाली आणि जलील निवडून आले. प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय मोर्चेबांधणीचा खरा फायदा लोकसभा निवडणुकीत एमआयएमनेच उचलला, तेवढा तो खुद्द प्रकाश आंबेडकरांनाही झाला नाही.

  • सुरेश पाटील

मुख्य संपादक, www.newstown.in

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती रहाणार की फाटाफूट होणार, हा गेली काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. आम्ही एकत्रच आहोत, शेवटचा फॉर्म भरेपर्यंत एमआयएमशी चर्चा करत राहू, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खा. असदुद्दिन ओवेसी यांचे ‘बडे भाई’ प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सकाळी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगत होते. त्यानंतर दुपारीच एमआयएमचे खासदार आणि ओवेसींचे ‘छोटे भाई’ इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसे शिरली आहेत, त्यांच्या सांगण्यावरूनच वंचितने एमआयएमशी युती तोडली, असा गंभीर आरोप ‘वंचित’चे पूर्वाश्रमीचे नेते लक्ष्मण माने यांच्या भाषेत केला. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दोन्ही पक्ष एकत्र राहून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले तर लोकसभा निवडणुकीपेक्षाही चांगला ‘इम्पॅक्ट’ पाडता येऊ शकतो, अशी कार्यकर्त्यांची भावना असली तरी या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे ती भावना थिजून जाते की काय, अशी भिती व्यक्त होती. शेवटी एमआयएमचे प्रमुख असदोद्दिन ओवेसी यांनी मंगळवारी केलेल्या खुलाशानंतर लोकसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालून निवडणुकीला सामोरे गेलेले वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत खा. ओवेसी यांनी ‘सुनो काँग्रेसवालो, प्रकाश आंबेडकर मेरे बडे भाई है, उनकी मांगे मांगो.उनका सन्मान रखो, मैं महाराष्ट्र में लोकसभा की एक भी सीट न लडूंगा’. बालासाहब की हर कोशीश में मैं हर वक्त उनके साथ खडा रहूंगा, उनका साथ दूंगा’ असे नांदेड आणि त्यानंतरच्या अनेक सभांमध्ये उच्चारवात सांगितले होते. ओवेसींच्या भाषणांतील जोश आणि त्यांचे प्रकाश आंबेडकरांप्रती वाक्यावाक्यांतून व्यक्त होणारे प्रेम पाहून वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते, मतदार सर्वच भारावून गेले होते. भट्टी जमली होती. वातावरण पेटले होते. उभय नेत्यांच्या झंझावाती सभा आणि त्या सभांना होणारी गर्दी पाहून वंचित बहुजन आघाडीच्या किती जागा येणार याचे आडाखे बांधले जात होते. राजकीय समीकरणे घडत होती- बिघडत होती. प्रकाश आंबेडकर प्रचारसभांमधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करत चालले होते. एमआयएमचे प्रमुख ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील शांत होते. वंचितने औरंगाबादची उमेदवारी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना जाहीर केली. तरीही ते शांत होते.

खा. ओवेसी यांनी ‘सुनो काँग्रेसवालो, प्रकाश आंबेडकर मेरे बडे भाई है, उनकी मांगे मांगो.उनका सन्मान रखो, मैं महाराष्ट्र में लोकसभा की एक भी सीट न लडूंगा’. बालासाहब की हर कोशीश में मैं हर वक्त उनके साथ खडा रहूंगा, उनका साथ दूंगा’ असे नांदेड आणि त्यानंतरच्या अनेक सभांमध्ये उच्चारवात सांगितले होते. ओवेसींच्या भाषणांतील जोश आणि त्यांचे आंबेडकरांप्रती वाक्या वाक्यांतून व्यक्त होणारे प्रेम पाहून वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते, मतदार सर्वच भारावून गेले होते.

प्रकाश आंबेडकरांच्या सभा सुरूच होत्या. दिवसेंदिवस अनुकुल वातावरण निर्माण होते चालले होते. थोडे दिवस गेले आणि एमआयएमने अचानक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. तेव्हाच एमआयएम- वंचितमध्ये थोडी खडाखडी झाली, पण ती बाहेर आली नाही. एमआयएमने भांडूनच हा मतदारसंघ मिळवून घेतला. प्रकाश आंबेडकरांप्रती महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याची हीच नामी संधी आहे, हे एमआयएमने बरोबर हेरले. मतदारसंघ मिळाला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील दलित, बहुजन, ओबीसी, धनगर अशा मतदारांनी एमआयएमच्या जलील यांना प्रकाश आंबेडकरांकडे पाहून डोळे झाकून मतदान केले. या मतदारसंघातील गंगापूरसारख्या तालुक्यात एमआयएमची शाखाही नसताना त्या तालुक्यातून एमआयएमला 50- 52 हजार मते मिळाली आणि जलील निवडून आले. प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय मोर्चेबांधणीचा खरा फायदा लोकसभा निवडणुकीत एमआयएमनेच उचलला, तेवढा तो खुद्द प्रकाश आंबेडकरांनाही झाला नाही.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम राज्यातील विधानसभा निवडणुकीसह पुढच्या सर्वच निवडणुका एकत्रितच लढवतील, असे तेव्हाच प्रकाश आंबेडकर, असदोद्दिन ओवेसी महाराष्ट्राला सांगत होते. लोकांनाही ते बरे वाटत होते. पर्यायी राजकारणाचा भक्कम पायरोव होत आहे, हे पाहून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कायम दुर्लक्षित ठेवलेला, फक्त आणि फक्त मतांपुरताच वापरला गेलेला मतदार सुखावून जात होता. सत्तेची स्वप्ने पाहू लागला होता. इकडे एमआयएमचे प्रमुख असदोद्दिन ओवेसी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाकांक्षा वाढत चालल्या होत्या. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या प्रारंभी हे लक्षातच आले नाही. ते प्रकाश आंबेडकरांना ‘मेरे बडे भाई’ म्हणत वारंवार गोंजारणाऱ्या ओवेसींच्या प्रेमातच राहिले. ओवेसीही आपल्या राजकीय महत्वाकांक्षा व्यक्त करण्यासाठी स्वतःहोऊन पुढे झाले नाहीत. त्यासाठी त्यांनी पुढे केले ते एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना! तेव्हाच ही सगळी गडबड लक्षात येऊ लागली होती. तरीही प्रकाश आंबेडकर ओवेसींवर विश्वास ठेवून होते. परदेशातून बॅरिस्टर झालेले ओवेसी आणि परदेशीच शिकलेले प्रकाश आंबेडकर हे दोन उच्चविद्याविभूषित नेते! त्यामुळे ओवेसी असा काही दगाफटका करतील, याची कल्पनाही प्रकाश आंबेडकरांनी केली नसावी. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने एमआयएमला वगळून वंचित बहुजन आघाडीशी युतीची बोलणी करण्याचा प्रस्तावही फेटाळून लावला होता. पण जे व्हायचे ते होऊन गेले आहे.

औरंगाबादेतील एमआयएमचा विजय म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी आहे, असा अर्थ काढणे म्हणजे मोठीच गल्लत करून घेण्यासारखे आहे. 2012 च्या नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या याच महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमला खातेही उघडता आले नाही. भिवंडी, मालेगाव, परभणीत मुस्लिमबहुल प्रभागात एमआयएमचे नव्हे तर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आहेत.

एमआयएम- वंचित बहुजन आघाडीच्या फाटाफुटीमुळे वंचितचे फारसे राजकीय नुकसान होण्याची शक्यता तशी कमीच आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पॅटर्न पाहिला तर हेच स्पष्ट होते. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील एमआयएमचा विजय म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी आहे, असा अर्थ काढणे म्हणजे मोठीच गल्लत करून घेण्यासारखे आहे. जो काही मुस्लिम मतदार एमआयएमला जो मानत होता, तोही त्यांच्यापासून दुरावला गेला आहे.  प्रारंभीच्या काळात म्हणजेच 2010-12 च्या सुमारास राज्यातील अल्पसंख्याकबहुल शहरांत एमआयएमचा बोलबाला सुरू झाला. परंतु नंतरच्या मुस्लिम पट्ट्यात एमआयएमची पिछेहाट सुरू झाली. 2012 च्या नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या याच महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमला खातेही उघडता आले नाही. काळात भिवंडी, मालेगाव, परभणी महानगर पालिकांच्या मुस्लिमबहुल प्रभागात एमआयएमचे नव्हे तर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. आमची महाराष्ट्रातील ताकद दाखवून देऊ, असे खा. इम्तियाज जलील सांगत आहेत. असे सांगण्यापूर्वी त्यांनीही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली असेलच.

ओवेसी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाकांक्षा वाढत चालल्या होत्या. वंचित आणि प्रकाश आंबेडकरांच्या प्रारंभी हे लक्षातच आले नाही. ते प्रकाश आंबेडकरांना ‘मेरे बडे भाई’ म्हणत वारंवार गोंजारणाऱ्या ओवेसींच्या प्रेमातच राहिले. ओवेसीही आपल्या राजकीय महत्वाकांक्षा व्यक्त करण्यासाठी स्वतःहोऊन पुढे झाले नाहीत. त्यासाठी त्यांनी पुढे केले ते इम्तियाज जलील यांना! तेव्हाच ही सगळी गडबड लक्षात येऊ लागली होती. तरीही प्रकाश आंबेडकर ओवेसींवर विश्वास ठेवून होते.

राजकारण हा शक्यता, विश्वासघात आणि दगेबाजीचाच खेळ आहे, असे या ना त्या संदर्भाने नेहमीच सांगितले जाते. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या दोस्तान्यात एवढ्या लवकर फाटाफूट होईल, अशी शक्यता कुणीच गृहित धरली नव्हती. आपल्या ‘बडे भाई’वरील ओवेसींचे प्रेम एवढ्या झटपट आटून जाईल, असेही कोणाला वाटले नव्हते. पण ते आटून गेले, ही वस्तुस्थिती आहे. या फाटाफुटीमुळे एक गोष्ट मात्र नक्की होईल. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एमआयएम आणि खा. ओवेसी यांच्या राजकीय विश्वासार्हतेकडे या पुढे कायमच संशयाने पाहिले जाईल. त्यामुळे फायदा झालाच तर तो वंचित बहुजन आघाडीचा होईल, एमआयएमचा नाही!

3 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा