मुंबईः संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वंचित बहुजन आघाडीने 180 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. सर्व जातीजमातींना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी या यादीतच उमेदवारांच्या नावांपुढे त्यांच्या जातीचा उल्लेखही मुद्दाम करण्यात आला आहे. नांदेड उत्तरमधून मुकुंद चावरे, भोकरदनमधून नामदेव आईलवार, अकोल्यातून हरिभाऊ भदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांच्या विरोधात भोकरमधून वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवार यांना मैदानात उतरवले आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे आंबेडकर म्हणाले.
विभागनिहाय उमेदवार यादी अशी :
मराठवाडा
नांदेड उत्तर : मुकुंद चावरे
नांदेड दक्षिण : फारूक अहमद इक्बाल अहमद
किनवट : हमराज उईके
लोहा : विनोद पापीनवार
भोकरदन : दीपक बोराडे
बदनापूरः राजेंद्र मगरे
जालना : अशोक रामराव खरात
परतूर : राजपालसिंग राठोड
परभणी : शेख मोहम्मद गौस
भोकर : नामदेव आईलवार
नायगाव : मारूतीराव कवळे
देगलूर : प्रा. रामचंद्र भरांडे
वसमत : शेख फरीद इस्तियाक पटेल
जिंतूर : मनोहर वाकळे
गंगाखेड : करूणा कुंडगीर
पाथ्री : विलास बाबर
सिल्लोड : दादाराव वानखेडे
कन्नड : अनिल चव्हाण
फुलंब्री : जगन्नाथ रेठे
औरंगाबाद मध्य : अमित भुईगड
पैठण : विजय चव्हाण
गंगापूर : अंकुश काळवणे
वैजापूर : प्रमोद नांगरे पाटील
विदर्भ
सिंदखेड राजा : सविता मुंढे
बुलडाणा : डॉ. तेजल काळे
यवतमाळ : योगेश पारवेकर
दिग्रस : अॅड. समीउल्ला खान
आर्णी : निरंजन मेश्राम
पुसद : ज्ञानेश्वर बाले
अकोला पश्चिम : इम्रान पंजांनी
अकोला पूर्व : हरिभाऊ भदे
अमरावती : आलीम वाहिद पटेल
कामठी : राजेंद्र काकडे
रामटेकः भोजराज बोंडे
भंडारा : अॅड. नितीन बोरकर
गडचिरोली : गोपाळ मगरे
वर्धा : आनंद उमाटे
चिखली : अशोक सुराडकर
खामगाव : शरद वस्त्कार
जळगाव जामोद : शरद बनकर
बाळापूर : धैर्यवान फुंडकर
रिसोड : दिलीप जाधव
कारंजा : डॉ. राम चव्हाण
धाम रेल्वे : निलेश विश्वकर्मा
बडनेरा : प्रमोद इंगळे
अमरावती : आलीम वाहीद पटेल
तिवसा : अॅड. दीपक सरदार
दर्यापूर : रेखा वाकपांजर
अचलपूर : नंदेश आंबाडकर
मोर्शी : नंदकिशोर कुईटे
आर्वी : रुपचंद टोपले
देवळी : सिद्धार्थ डोईफोडे
वर्धा : आनंद उणाटे
उमरेड : रुक्षादास बनसोडे
नागपूर पूर्व : रोशन साव
नागपूर उत्तर : विनय भांगे
तुमसर : विजय शहारे
अर्जुनी मोरगाव : रिता लांजेवार
तिरोडा : संदीप पोगामे
आमगाव : सुभाष रामरामे
आरमोरी : रमेश कोरचा
राजुरा : गोदारू पाटील जुमनाके
चंद्रपूर : तथागत पेटकर
ब्रह्मपुरी : चांद्रलाल मसराम
चिमुर : अरविंद सांदेकर
वरोडा : आमोद बावणे
वणी : डॉ. महेंद्र लोढा
राळेगाव : महादेव कोहळे
उत्तर महाराष्ट्र
नंदूरबार : दीपा वळवी
भुसावळ : प्रा. सुनीन दादा सुरवाडे
जळगाव शहर : शफी अब्दुल नवी शेख
जळगाव ग्रामीण : उत्तम सपकाळे
चाळीसगाव : मोरसिंग राठोड
नवापूर : जगन गावीत
अक्कलकुवा : अशोक तडवी
साक्री : यशवंत माळचे
धुळे शहर : इम्रान शेख ईसाल
सिंदखेडा : नामदेव येळवे
शिरपूर : प्रा. मोतीलाल सोनावणे
चोपडा : अरूणा बाविस्कर
रावेर : हाजी सय्यद मुश्ताक सय्यद कमरूद्दिन
आळमनेर : श्रावण धर्मा वंजारी
एरंडोल : गोविंद शिरोळे
पाचोरा : नरेश पाटील
जामनेर : सुमित चव्हाण
मलकापूर : डॉ. नितीन नांदूरकर
मुंबई
वडाळा : लक्ष्मण पवार
सायन कोळीवाडा : आमीर इद्रिसी
कलिना : मनीषा जाधव
घाटकोपर (पूर्व) : विकास पवार
घाटकोपर (पश्चिम) : जालिंदर सरोदे
चांदीवली : अब्दूल हसन अली हसन खान
अंधेरी (पूर्व) : शरद यटम
अंधेरी (पश्चिम) : प्रकाश कोकरे
मालाड (पश्चिम) : सयीद सोहेल असगर रिझवी
चारकोप : मोरीस केणी
भांडूप (पश्चिम) : सतीश जयसिंग माने
विक्रोळी : सिद्धार्थ मोकळे
बोरीवली : निखिल विनेरकर
मीरा-भायंदर : सलीम अब्बास खान
VBA