व्हायरल व्हिडीओ: बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

0
55666
व्हायरल व्हिडीओतील स्क्रीनशॉट

औरंगाबादः पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या  बीड जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजचा असून 16 एप्रिल 2019 रोजीचा आहे. हा सीसीटीव्ही नेमका कुठला आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी पाच क्रमांकाच्या कॅमेऱ्यात ही द‍ृश्य चित्रित झालेली आहेत. हा व्हिडीओ रात्री 10 वाजून 50 मिनिटापासून ते रात्री 10 वाजून 51 मिनिटे आणि 48 सेकंदांपर्यंत चालतो. व्हिडीओत दिसणारा पुरूष लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेचा सदस्य असून तो बीड जिल्ह्यातीलच एका माजी मंत्र्याच्या अत्यंत विश्वासातील असल्याचे सांगितले जाते. तर व्हिडीओतील महिला लोकप्रतिनिधी माजी आमदार असल्याचे कळते.

 विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच घडलेला हा प्रकार आहे. हा व्हिडीओ एखाद्या लोकप्रतिनिधीची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठीचे हत्यार म्हणून वापरण्यासाठी तयार ठेवला होता की काय, अशीही शंका घेतली जात असून हा व्हिडीओ आताच व्हायरल करण्यामागचे नेमके कारणही गुलदस्त्यात आहे. राजकीय उट्टे काढण्यासाठीच या राखीव तंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा बीड जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. निष्कारण कोणाचेही चारित्र्यहनन होऊ नये म्हणून आम्ही या व्हिडीओतील चेहरा मुद्दामच ब्लर केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा