अपने को तो रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके… करुणा शर्माची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!

0
1260

बीडः  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन हंगामा करण्याचा हेतू घेऊन परळीला आलेल्या करुणा शर्मा यांची एका व्यक्तीशी बोलतानाची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये करूणा शर्मा अपने को तो रायता फैलाना हे, पैसे निकालने है प्रेशर बनाके, असे म्हणताना स्पष्टपणे ऐकू येत आहे.

व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये करुणा शर्माला समोरचा व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन काही आरोप करणे म्हणजे कोर्टाचा अवमान होईल, असे धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सुषमा सिंह यांनी जारी केलेल्या नोटिसाचा हवाला देऊन सांभाळून बोला असा सल्ला देत आहे. त्यावर करुणा शर्मा म्हणतात, ‘ये तो बहुत अच्छा हुआ, इसमे तो फायदा है अपना, मै मंदिर जाऊंगी, और रायता फैला दूंगी। अपने को क्या रायता फैलाना है, अपने को पैसे निकालने है प्रेशर बनाके पैसे… असे म्हणताना ऐकायला मिळत आहे.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

मागील काही दिवसांपासून करुणा शर्मा व त्यांचे साथीदार हे सगळं केवळ ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच करत आहेत हे या व्हायरल ऑडिओ क्लिप वरून स्पष्ट होत आहे. व रविवारी परळीत येण्याचा त्यांचा उद्देशही हाच होता हेही या कॉल रेकॉर्डिंगवरून स्पष्ट होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगची सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे. न्यूजटाऊन या कॉल रेकॉर्डिंगच्या सत्यतेचा दावा करत नाही.

हेही वाचाः मंत्री धनंजय मुंडेंभोवती फास टाकायला आल्या, पण स्वतःच ‘अशा’ जाळ्यात अडकल्या करूणा शर्मा!

दरम्यान, करूणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांचा ड्रायव्हर अरूण मोरेला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 व्हायरल झालेली ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग अशी…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा