कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सूर्यग्रहण वेबकास्टवरच पहा

0
50
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः या वर्षातील पहिले सूर्यग्रहण उद्या रविवारी म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील आमावस्येला लागणार असून संपूर्ण देशभरात दिसणारे हे सूर्यग्रहण काही भागांत खग्रास तर काही भागात कंकणाकृती दिसणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हे सूर्यग्रहण वेबकास्टवरच पहावे, असा सल्ला नेहरू स्मारक संग्रहालयय आणि ग्रंथालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत देशभरातील विविध ठिकाणी या सूर्यग्रहणाचा मध्य असणार आहे. दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी हे सूर्यग्रहण संपणार आहे.

मुंबईत सकाळी १० वाजता सुरू होईल आणि     दुपारी १ वाजून २७ मिनिटे संपेल. पुण्यात सकाळी १० वाजून ०२ मिनिटांना हे ग्रहण सुरू होईल आणि दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी संपेल. अहमदनगरमध्ये सकाळी १० वाजून ०५ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहणदुपारी १ वाजून ३४ मिनिटांनी सुटेल. तर औरंगाबादेत सकाळी १० वाजून ०७ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहण दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी संपेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा