येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा

0
179
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्याचा फटका बसत असल्यामुळे आधीच महाराष्ट्रातील नागरिक हैरान असताना आता येत्या दोन दिवसांत राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही उष्ण तापमान असेल. या वातारवणामुळे अनेक आजार उद्धभवण्याचाही धोका आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेचा फटका बसू नये म्हणून नागरिकांनी शरीरातील पाणीपातळीत वाढ करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

मुंबईमध्येही उष्णतेच्या लाटेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. येत्या दोन दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील आणि नंतर ते हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किनारपट्टी भागाठी उष्णतेच्या लाटेच्या निकषानुसार कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअस वर असावे आणि कमाल तापमान किमान ३७ अंश सेल्सिअस असावे, असे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. भरपूर पाणी प्या, नागरिकांनी शक्यतो घरी रहावे, घरातील हवा खेळती रहील याची काळजी घ्यावी, असेही होसाळीकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा