कन्नड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊसः औट्रम घाटात दरड कोसळली, नागद गाव पाण्याखाली

0
675
कन्नडच्या औट्रम घाटातील दृश्य.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून या पावसामुळे कन्नडच्या औट्रम घाटात आज सकाळी दरड कोसळली असून औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तुफान पावसामुळे तालुक्यातील नदीला पूर आल्यामुळे नागद गाव पाण्याखाली गेले आहे.

कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कन्नडच्या औट्रम घाटातील दरड आज सकाळी कोसळली. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली आहेत. कन्नड घाटात दरड कोसळ्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून कन्नड-पानपोई- चापानेर-शिऊर बंगला-नांदगाव-चाळीसगाव अशा पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, कन्नड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. नदीला पूर आल्यामुळे नागद गाव पाण्याखाली गेले आहे. कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्याच्या परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भिलदरी-नागद पाझर तलाव फुटला आहे. कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे नदीला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

हेही वाचाः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पुढील २४ तास मुसळधार कोसळणार; मुंबईतही जोर वाढला

तिकडे जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस होत असून चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांत पाणी तुंबले आहे. गिरणा आणि तितूर या नद्यांना पूर आला आहे. तितूर नदीच्या पुरामुळे कजगाव-नागद, खाजोळा-नेरी-नागद रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून काल रात्रीपासूनच या गावांचा संपर्क तुटला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा