शेतकऱ्यांसाठी खुश खबरः पुढील पाच दिवसांत होणार पावसाचे पुनरागमन!

0
1218
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः आगमनालाच धो धो बरसलेला मान्सून नंतर गायब झाल्यामुळे पेरण्या करून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतानाच हवामान खात्याने त्यांच्यासाठी खुश खबर दिली आहे. पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार आहे. ७ ते ९ जुलैदरम्यान महाराष्ट्राच्या अनेक भागात वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दडी मारलेला मान्सून पुढील पाच दिवसात परतण्याची शक्यता आहे. ७ ते ९ जुलैदरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हा पाऊस सामान्यही असू शकतो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात या दिवसात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ ते ८ जुलैदरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. २ ते ८ जुलैच्या आठवड्यात विदर्भ तसेच लगतच्या मराठवाड्यात पाऊस होईल. ९ ते १५ जुलैदरम्यानच्या आठवड्यात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा