पुढील तीन तासांत महाराष्ट्रातील ‘या’ १२ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

0
743
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून आज राज्याच्या अनेक भागात पावासाने हजेरी लावली आहे. अशातच पुढील तासांत महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने आज सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी हा अंदाज वर्तवला आहे. वादळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असल्यामुळे या बारा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी धुवांधार पाऊस होण्याची शक्यता  आहे. आगमनाला पाऊस जोरदार बरसल्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. परंतु पेरण्या उरकल्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. गेल्या दहा ते बारा दिवासांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस क्षीण झाला होता. दोन दिवसांपासून काही तुरळक ठिकाणी मेघधारा बरसल्या खऱ्या, परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प होते. आता पाऊस पुन्हा सक्रीय झाल्यामुळे शेतकरी आनंदून गेला आहे. अशातच आता महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय, शनिवारपासून राज्यात सर्वदूर वाढणार पावसाचा जोर!

३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे पोहोचत आहेत. त्यामुळे पुढील तीन तासांत ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधरा पाऊस होण्याची अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे माजी महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे ८ किवा ९ जुलैपासून कोकणात पावसाला सुरूवात होईल. मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवेल. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून बाष्प जमिनीच्या दिशेने येत आहेत. त्यानंतर बंगालच्या उपसागरात ११ जुलै रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतात ९ जुलैपासून पाऊस सुरू होईल आणि ११ जुलैपासून त्याचा जोर आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा