विदर्भ, मराठवाड्याला पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा फटका, हवामान खात्याचा यलो अलर्ट

0
208
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः  महाराष्ट्रात एकीकडे थंडीचा कडाका वाढला असतानाच पुढील दोन दिवसात म्हणजेच २८ आणि २९ डिसेंबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे.

२६ डिसेंबरपासून वायव्य भारतावर तर २७ डिसेंबरपासून मध्य भारतावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून २८ आणि २९ डिसेंबर रोजी राज्याच्या काही जिल्ह्यात गडगडाटासह तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

२८ आणि २९ डिसेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. २८ मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

२९ डिसेंबर रोजीही जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २८ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचाः जमाव बंदीला हरताळः पहिल्याच दिवशी कुठेच दिसल्या नाही मुख्यमंत्र्यांचे आदेश राबवणाऱ्या यंत्रणा

 डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीच राज्याच्या काही भागात मुसळधार पावासाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आताही दोन दिवस विदर्भ- मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बळीराजावर आणखी एक अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. सध्या शेतीत रब्बीची पिके उभी आहेत. त्या पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे.

थंडीचा कडाका, आजचे किमान तापमान असेः राज्यात थंडीचा कडाका वाढला असून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील तापमान घसरले आहे. राज्यात गारठा कायम आहे. राज्यातील आजचे किमान तापमान असेः औरंगाबादः १२.४ अंश सेल्सिअस, जालनाः १३.२, परभणीः १४.५,  जळगावः ११.७, नांदेडः १५.२, सांगलीः १४.५, कुलाबाः २१.६, सांताक्रुझः १८, रत्नागिरीः १७.८, पुणेः १२.९, कोल्हापूरः १५.९, नाशिकः ११.७, ठाणेः १९, मालेगावः १३, बारामतीः १३.८, साताराः १४ आणि डहाणूः १८.८.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा