‘प्रधानमंत्री मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे नुसतेच बसवून ठेवले!’

0
351
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह १० राज्यांतील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या ऑनलाइन बैठकीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवले. बोलण्याची संधीच दिली नाही, अशा शब्दांत रोष व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन सर्व मुख्यमंत्र्यांना केले आहे.

प्रधानमंत्री मोदींनी १० राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या ऑनलाइन बैठकीला मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधीच देण्यात आली नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत. राज्यांना बोलण्याची संधीच दिली जात नसेल तर त्यांना बैठकीसाठी का बोलावले जाते? असा सवाल करत बोलण्याची संधी न दिल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध करायला हवा, असे बॅनर्जी म्हणाल्या.

 प्रधानमंत्री मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखे बसवून ठेवले. बोलण्याची संधीही दिली नाही. मोदींनी ऑक्सीजन आणि ब्लॅक फंसगबाबत कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी लसीकरणाबाबतही आमच्याकडे विचारणा केली नाही. त्यांनी दिलेली ही वागणूक अपमानास्पद आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा