रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांचा पुण्याच्या ईशा झा हिच्याशी नेमका काय संबंध?

0
2781
संग्रहित छायाचित्र.

पुणेः हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुण्याच्या चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केलेले माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत या गुन्ह्यात पुण्यातील एक ३७ वर्षीय महिलाही सहभागी आहे. ईशा बालाकांत झा असे या महिलेचे नाव असून ती महिला कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना यांनी आपल्याशी वैवाहिक संबंध तोडले आहेत, असे स्वतःच सांगणारे हर्षवर्धन जाधव यांच्या गाडीत ईशा कशी? ईशाचा आणि हर्षवर्धन जाधवांचा काय संबंध? असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

सोमवारी पुण्यात ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बँक ऑफ महाराष्ट्रसमोर हर्षवर्धन जाधव आणि ३७ वर्षीय ईशा झा ही महिला जाधव यांच्या कारमध्ये ( क्रमांक एमएच २०- एफएम ९०९९) बसलेले होते. त्याचवेळी अजय चड्डा आणि त्यांच्या पत्नी ममता चड्डा हे दोघे दुचाकीवरून तेथून जात असताना हर्षवर्धन जाधव यांनी अचानक त्यांच्या कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे अजय आणि ममता चड्डा हे दुचाकीवरून पडून त्यांचा अपघात झाला. त्याचा जाब विचारला असता हर्षवर्धन जाधव यांनी मारहाणही केली. या मारहाण आणि शिविगाळीत ईशा झाही सहभागी होती. या प्रकरणी अमन चड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चतुश्रृंगी पोलिसांनी हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२५, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ईशा बालाकांत झा ही ३७ वर्षीय महिला पुण्याच्या वाकड येथील व्हिसलिंग पाम सोसायटीत राहते. तर हर्षवर्धन जाधव यांनी पुण्याच्याच पार्क एक्सप्रेस बालेवाडी हायस्ट्रीटचा पत्ता दिला आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून आपल्या वैवाहिक जीवनाची ‘करूण कहाणी’  जगजाहीर केली होती.

‘मी हर्षवर्धन जाधव. रावसाहेब दानवेंचा तिसरा जावई. २६ मार्च २००३ ला माझं दानवेंच्या मुलीशी लग्न झालं आणि नंतर काही काळानं तिनं माझ्यासोबतचे वैवाहिक संबंध तोडले. ते आजपर्यंत नीट झालेले नाहीत. बायकोचे आणि माझे कुठलेही वैवाहिक संबंध नसल्यामुळे त्याचा मला खूप त्रास झाला’, असे हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडीओत म्हटले होते.

हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्या वैवाहिक संबंधातील ताणतणावांच्या पार्श्वभूमीवरच आता ईशा बालाकांत झा या ३७ वर्षीय नवीन चरित्राची एन्ट्री झाल्याचे या गुन्ह्याच्या निमित्ताने उघड झाले आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांच्यात नेमके काय संबंध आहेत? पुण्यात सकाळच्या वेळी ते दोघे एकाच कारमध्ये काय करत होते?  असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा