जेएनयूमध्ये आल्यावरच आमची मुले ‘देशद्रोही’ का बनतात?

0
636
फोटोः द वायर

जे जेएनयूला देशद्रोही आणि गद्दार म्हणतात, ते एवढ्या प्रचंड असहमतीवाल्या जेएनयूला एक सहमतीची एकता प्रदान करतात. असहमत लोकांची एकता. देशद्रोही आणि गद्दार म्हणणाऱ्यांनी जेएनयूला एक प्रकारचे सामर्थ्य दिले आहे. एक प्रकारची ऊर्जा, ताकद दिली आहे. असहमतीवाला जेएनयू इथूनच लढण्यासाठी सहमत होतो.

  • चंद्रिका

 जेएनयू एक विद्यापीठ होते. आता तसे राहिले नाही. जेएनयू आता एक तर प्रेम आहे किंवा तिरस्कार तरी. मागील पाच वर्षांत देश आणि जगासाठी आता केवळ एवढेच जेएनयू शिल्लक राहिले आहे. त्यांच्या संघर्षासोबत उभे राहणे किंवा त्यांच्या संघर्षाचा तिरस्कार करणे. त्यांच्या मूल्यांची पाठराखण करण्यासाठी उभे राहणे किंवा त्यांची पाठराखण करणारांना बिगारी किंवा बिमारी संबोधणे. मागील पाच वर्षांतील आपल्या ‘तारीफ’मुळे जेएनयूची आता हीच ‘तारीख’ बनली आहे. एक ‘देशद्रोही आणि गद्दार’ जेएनयू! एका सरकारशी असहमत लोकांचे प्रेम जेएनयू. या जेएनयूमध्ये अनेक जेएनयू होते आणि आहेतही. बदलून जे जेएनयू निर्माण निर्माण झाले आहे ते असहमतींच्या एकतेचे जेएनयू आहे.

आधी ते फक्त जेएनयूच्या आतपुरतेच सिमीत होते, आता ते संपूर्ण देशभर झाले आहे. आता ती एक सवयच झाले आहे. आता देशात कुठेही असहमती दर्शवणे जेएनयूचा विद्यार्थी होण्यासारखे होऊन बसले आहे. जो कुणी असहमत असेल, तो जेएनयूवाला आहे. तो असहमतीवाल्या जेएनयूच्या बाजूचा आहे.

जे जेएनयूला ‘देशद्रोही आणि गद्दार’ म्हणतात, ते एवढ्या प्रचंड असहमतीवाल्या जेएनयूला एक सहमतीची एकता प्रदान करतात. असहमत लोकांची एकता. ‘देशद्रोही आणि गद्दार’ म्हणणाऱ्यांनी जेएनयूला एक प्रकारचे सामर्थ्य दिले आहे. एक प्रकारची ऊर्जा, ताकद दिली आहे. असहमतीवाला जेएनयू इथूनच लढण्यासाठी सहमत होतो.

खरेच असहमत असणे वाईट गोष्ट आहे का? कमी शब्दांत सांगायचे तर हेच तर लोकशाहीचे फलित आहे. असहमती दर्शवण्याचा हक्क. जुन्या ‘तारीख’च्या याच असहमतीनेच जगाला बदलून टाकले आहे. जगात लोकशाही अस्तित्वात येण्याआधी असायचा, तो राजा या असहमतीनेच बदलला होता. जुन्या ‘तारीख’मधील असहमतीनेच राजेशाही बदलली आहे. जग चालवणारी ही बदललेली व्यवस्था असहमतींच्या मार्गानेच इथपर्यंत पोहोचली आहे. ती आजही आहे. ती जशी आता बिघडत चालली आहे. तिचे दिवस, आता खूपच कमी झाले आहेत. आता तिचे चांगले दिवस जणू संपुष्टात आले आहेत.


जे आज सरकारच्या बाजूने बोलत आहेत, ते सामर्थ्यवानाच्या बाजूनेच बोलत आहेत. जे आमच्यावर शासन करतात, त्यांच्या बाजूने ते बोलत आहेत. आपल्यावर शासन करणारांच्या बाजूने बोलणे म्हणजे स्वतःच्याच विरोधात बोलणे आहे. आपल्या हक्कांसाठी बोलणे, त्यांच्या विरोधात बोलणे आहे. त्यांच्याशी असहमत असणे आहे. ही असहमती म्हणजेच जेएनयू!

ज्या लोकशाहीत ते शासक म्हणून आले आहेत, तिच्यासाठी भूतकाळात न जाणे किती पूर्वजांनी आपले रक्त सांडले आहे. ज्यांचे रक्त सांडले, ते सर्व असहमत लोकच होते. जे काही चालले होते, त्याच्याशी असहमत लोक! ते सहमत असते तर आज एक राजा राहिला असता. जगात असंख्य राजे राहिले असते. मतदान करण्याचा आणि निवडण्याचा हक्क प्राप्त करून घेण्याची संधीही राहिली नसती. राजाच्या राजा असण्यावर काही लोक सहमत नव्हते. ते सर्व त्यांच्या काळातील जेएनयूच होते. जे सांडले होते, ते याच असहमत लोकांचे रक्त होते.

राजा आणि सत्तेशी तेव्हाही पुष्कळ सहमत होते. सत्ता आणि सरकारशी आजही पुष्कळ सहमत आहेत. कारण सहमती एक प्रकारची सुविधा आहे. सहमती म्हणजे निवांतपण. सामर्थ्यवान लोकांच्या सोबतीला उभे राहिल्याचे निवांतपण. सत्तेसोबत ठाम राहिल्याचे निवांतपण. पण जे सहमत होते, ते त्या ‘तारीख’ नंतरच्या ‘तारीख’ला हारले होते. ते स्वतःच्याच विरोधात होते. स्वतःवर होणाऱ्या जुलुमाच्या सोबत होते. कारण सत्तेची सुविधा फक्त सत्तेकडेच राहणार होती. जनतेसाठी सहमतीचे निवांतपण एक उत्कटभाव होता. जनतेसाठी सत्तेशी सहमतीचे निवांतपण आजही एक उत्कटभावच आहे. सहमती परिवर्तनाच्या संधीच संपुष्टात आणते. सहमती सामर्थ्यवानाच्या मागे उभे राहण्याच्या सुविधेसारखी आहे.

जे आज सरकारच्या बाजूने बोलत आहेत, ते सामर्थ्यवानाच्या बाजूनेच बोलत आहेत. जे आमच्यावर शासन करतात, त्यांच्या बाजूने ते बोलत आहेत. आपल्यावर शासन करणारांच्या बाजूने बोलणे म्हणजे स्वतःच्याच विरोधात बोलणे आहे. आपल्या हक्कांसाठी बोलणे, त्यांच्या विरोधात बोलणे आहे. त्यांच्याशी असहमत असणे आहे. ही असहमती म्हणजेच जेएनयू! काही दिवसांपूर्वी कन्हैया कुमार आणि जेएनयू देशासाठी पर्याय बनले. देशात कन्हैया कुमारचे प्रसंशक आणि त्याच्याशी सहमत लोक कितीही असले तरी कन्हैया कुमार आणि त्याच्या विचारांशी अहसमत सर्वात जास्त लोक जेएनयूमध्येच भेटतील. जेएनयूची ही असहमतीच लोकशाहीचे सौंदर्य आहे. तिलाच ते चिरडून टाकू पहात आहेत. त्यांना असहमतीच्या लोकशाहीसोबत यायचेच नाही.


वाढीव शुल्काचा मुद्दा फक्त जेएनयूचा नाही. संकोचलेल्या स्वातंत्र्याचा मुद्दाही केवळ एकट्या जेएनयूचा नाही. लिहिण्या- वाचण्याच्या हक्काचा मुद्दा काय फक्त एकट्या जेएनयूचा आहे? हा जनतेचा मुद्दा आहे. येऊ घातलेल्या जनतेचा. ती एक तर तुमची मुले असतील किंवा तुमच्या मुलांची मुले!

एका विद्यापीठाची धास्ती एवढी वाढावी की पोलिसांसोबत सैन्य बल रस्त्यावर उतरवावे लागावे. एका विद्यापीठाची धास्ती एवढी वाढावी की सरकारला त्या विद्यापीठाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी खर्च करावा लागावा. देशातील नागरिकांच्या मनात आपल्याच देशातील मुलांच्या विषयी तिरस्काराची भावना भरावी लागावी. देशातील घराघरात असल्याच्या दावा करणारा पंतप्रधान जेव्हा भयभीत होऊन सूड उगवण्याची योजना तयार करतो किंवा करायला लावतो, असे एवढे एका विद्यापीठात काय आहे? असे का आहे एका विद्यापीठात?

वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारी मुले इथे आल्यावर लढणारी मुले बनतात, असे का होते? आपली मुले ‘देशद्रोही’ मुले बनतात? त्याचे कारण आहे असहमत दर्शवण्याचा हक्क. हा हक्कच सर्वांसाठी समानतेची मागणी आहे. सर्वांसाठी स्वस्त शिक्षणाची मागणी त्याचसाठी आहे. सर्वांसाठी मोफत शिक्षणाची मागणी त्याचसाठी आहे.!वाढीव शुल्काचा मुद्दा फक्त जेएनयूचा नाही. संकोचलेल्या स्वातंत्र्याचा मुद्दाही केवळ एकट्या जेएनयूचा नाही. लिहिण्या- वाचण्याच्या हक्काचा मुद्दा काय फक्त एकट्या जेएनयूचा आहे? हा जनतेचा मुद्दा आहे. येऊ घातलेल्या जनतेचा. ती एक तर तुमची मुले असतील किंवा तुमच्या मुलांची मुले!

लोकांनी झगडून जे प्राप्त केले होते ती लोकशाहीच्या अधिक लोकशाहीवादी होत जाण्याची बाब होती. ती राज्याने अधिक कल्याणकारी होत जाण्याची बाब होती. राज्याच्या वतीने जनतेला वादे करण्याची बाब होती. त्यांच्या दाव्याची बाब होती. त्यांचे दावे आज विकास आणि वृद्धीच्या घोषणांचा पुनरूच्चार करत आहेत. त्याचे समर्थन करून तुम्ही शायनिंग इंडिया गात आहात. सत्तर वर्षांत पहिल्यांदा भारत सुधारला, असे ते म्हणत आहेत. मग हे सुधारलेपण त्यांच्या बोलण्यापुरतेच मर्यादित का रहावे, तुमच्या घरापर्यंत का पोहोचू नये?  हे शुल्क का वाढवले जावे? ते कमी का केले जाऊ नये? पहिल्यापेक्षाही कमी का केले जाऊ नये? भलेही ते 100 रुपयांवरून 99 रुपये करा. सत्तर वर्षांत शिक्षणाचा जो खर्च होता, तुम्हाला त्यापेक्षा कमी खर्च करावा लागायला हवा. कारण देश सुधारला आहे. जेएनयूच नव्हे, सर्वांच्या शिक्षणाचा खर्च कमी करायला हवा. सर्वांच्या औषधांचे खर्च कमी करायला हवे. सुधारलेल्या देशाने तुम्हाला आणि आम्हालाही थोडे सुधारलेपण द्यावे.

तुम्ही याच्यासाठी आवाज उठवायला हवा की नको? सुधारत चाललेल्या देशात तुम्हाला आणि जनतेलाही सुधारणा मिळायला हव्यात की नाही? देश सुधारलेला असताना तुम्हाला आणखी वाईट सुविधा मिळाव्यात अशी तुम्ही मागणी करणार का? जेव्हा राजेशाही समृद्ध होत होती, तेव्हा सोन्याची नाणी बनवायची. समृद्ध होत चाललेल्या देशाने आपल्या लोकांना सुविधा आणि निवांतपण दिलेच पाहिजे. किंबहुना शिक्षण मोफतच केले पाहिजे.


सत्तर वर्षांत पहिल्यांदा भारत सुधारला, असे ते म्हणत आहेत. मग हे सुधारलेपण त्यांच्या बोलण्यापुरतेच मर्यादित का रहावे, तुमच्या घरापर्यंत का पोहोचू नये?  शुल्क का वाढवले जावे? ते कमी का केले जाऊ नये? पहिल्यापेक्षाही कमी का केले जाऊ नये? भलेही ते 100 रुपयांवरून 99 रुपये करा. कारण देश सुधारला आहे. जेएनयूच नव्हे, सर्वांच्या शिक्षणाचा खर्च कमी करायला हवा!

सरकार विद्यार्थ्यांना शिकवून आपल्याचसाठी कुशल मनुष्यबळ तयार करत असेल तर जनतेने शिक्षणाचा खर्च का द्यावा? हा खर्च त्या माय-बापांनी का करावा, जे सरकारला मनुष्यबळ म्हणून आपली मुले-मुली देतात? मुला-मुलींना राज्याची संसाधने होण्यासाठीचा खर्च त्यांनी का द्यावा? राज्याने आपली संसाधने तयार करण्यासाठी अशी दुहेरी वसुली का करावी? कारण संसाधने झाल्यानंतर आपल्या मेहनतीवर करही आम्हीच भरत आहोत.

आमच्या मेहनतीचा एक भाग त्याचा नफा बनत आहे. आमच्या मेहनतीच्या एका भागातून ते कर घेत आहे. आम्ही जी काही खरेदी करतो, त्यावर पुन्हा कर घेते. जेव्हा राज्य आम्हाला संसाधने म्हणून तयार करत आहे, तर त्याची वसुली आमच्याकडूनच का केली जावी?  राज्य वसुली करणारा गुंडा आहे की काय? राज्य आमच्याशी काही सौदा करतो?  मोफत शिक्षण काही उपकार आहे का? ती कोणाच्या कराच्या पैशातून ऐय्याशीही नाही. तर ती राज्याकडून आपली संसाधने तयार होण्याच्या आधी केली गेलेली गुंतवणूक आहे. ती त्याने केलीच पाहिजे. जी तुम्ही- आम्ही वर्षानुवर्षे करत आलो आहोत. भरत आलो आहोत. मेंदूला त्याची सवय पडली आहे. आणि आम्ही काही राज्याला मोहलत मागत नाही. राज्याने आपल्या संसाधनांच्या तयारीचा खर्च स्वतः करावा, इतकेच. कारण ते राज्य आहे, ते काही वसुली करणारा गुंडा नव्हे!

शुल्क वाढ आणि कराच्या पैशातून शिक्षणाचे जे लोक समर्थन करत आहेत, ते देश आणि जनतेवर प्रेम करणारे लोक नाहीत. ते जनतेच्या विरोधात उभे राहिलेले लोक आहेत. ते लोक या राज्याला गुंडात रुपांतरित इच्छित आहेत. ते त्याला एक लोकशाही राज्य नव्हे तर वसुली करणारा गुंडा बनवू पहात आहेत. एक असा गुंडा जो तुमच्याकडून चुकीची वसुली करतो. भीती दाखवतो. धमकावतो आणि तुमच्या असहमतीवर तुम्हाला आपल्या शस्त्रांनी बदडून काढतो. नागरिक म्हणून अशाचे समर्थन कोण करणार? जे देशावर प्रेम करतात, ते त्याला गुंडा बनू देतील? धमकावणारा, भीती घालणारा, वसुली करणारा गुंडा!  ते देशाच्या विरोधातील आणि देशाशी तिरस्कार करणारे लोक आहेत, जे त्याला वसुली करणाऱ्या गुंडाच्या हद्दीपर्यंत घेऊन जाऊ पाहात आहेत. त्याची वसुली वाढवू पाहात आहेत. त्या वसुलीतील नफ्यात हिस्सा मिळवू पाहात आहेत. या वसुली आणि नफ्यातून ते नागरिकाचे नागरिक असण्याचे स्वातंत्र्यही हिरावून घेत आहेत. एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी ते अबाधित राखले पाहिजे. त्याच्याशी असहमत झाले पाहिजे. असहमतीला हल्ली जेएनयू संबोधले जाऊ लागले आहे!

सौजन्यः द वायर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा