ब्रम्हांडातील सर्व ग्रहांना आहेत, पण सूर्य आणि चंद्रालाच नावे का नाहीत?

0
117

सर्व ग्रहांना शक्तिशाली ग्रीक आणि रोमन देवी-देवतांची नावे देण्यात आली आहेत. त्यांच्या चंद्रांना या देवी-देवतांशी संबंधित पौराणिक पात्रांची नावे देण्यात आली आहेत. ताऱ्यांना  ‘सिरियस’, आणि ‘बिटेल्यूज’ अशी छान नावे देण्यात आली आहेत. पण आपला चंद्र आणि सूर्य? त्यांना कोणतीही नावे देण्यात आली नाहीत. आपला चंद्र आणि सूर्य फक्त चंद्र आणि सूर्यच आहेत. असे का?

आपल्या संस्कृतीच्या इतिहासात एकूणच इतिहासात नावांना अनन्य साधारण महत्व राहिले आहे. तुमचे नाव तुमच्या कुटुंबाचे मूळ, तुमचे लिंग एवढेच काय तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी महत्वाची माहिती प्रतिबिंबित करू शकते. अनेक पालक आपल्या मुलासाठी योग्य नाव निवडण्यासाठी कित्येक महिने घालवतात. शोधाशोध करतात. आणि जेव्हा ते योग्य निर्णयावर पोहोचतात, तेव्हाच ते नाव ठेवतात. एकदा ठेवलेले नाव पुन्हा काही केल्या बदलत नाहीत!

मग आपल्या ब्रम्हांडाच्या विविध भागांना नावे देण्याचा सर्वांत महत्वाचा अधिकार कोणाकडे आहे? 100 वर्षांपूर्वी, म्हणजेच जुलै 1919 मध्ये स्थापन झालेला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ ( आयएयू) हे महत्वाचे काम करतो. याच आयएयूने प्लुटो आता ग्रह राहिलेला नाही, अशी घोषणा 2006 मध्ये केली होती. आयएयूने मोठे ग्रह ( बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ इत्यादी), लघुग्रह, त्याहून छोटे ग्रह, तारे, धुमकेतू इत्यादींची अधिकृत नावे ठेवली आहेत. पण जेव्हा प्रश्न सूर्य आणि चंद्राचा येतो, तेव्हा घोडं पेंड खाताना दिसते.

सूर्य हा आपल्या सौर मंडळाच्या केंद्रस्थानी असलेला मुख्य तारा. पृथ्वी आणि सौर मंडळातील अन्य घटक त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. आयएयूच्या मते, प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराचे कॅपिटलायजेशन हे दर्शवते की, ती खरोखर उचित संज्ञा आहे.

नावात काय आहे?

जॉन वेन यांच्या ‘ बिग जेक’ या क्लासिक चित्रपटात ड्यूकच्या पात्राने त्याच्या साथीदार कुत्र्याचे नाव साधेसरळ ठेवलेः कुत्रा. अशा प्रकारच्या स्पष्ट आणि अर्धवट ‘नाव’ त्या जोडीचे भविष्यातील संबंध चांगले रहाणार नाहीत, असे ध्वनित करते, असे ‘ इनसाइड ऑफ ए डॉगः व्हाट डॉग्ज सी, स्मेल आणि नो?’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अलेक्झांड्रा होरोवित्झ म्हणतात. ज्या कुत्र्याला तुम्ही घरी आणणार आहात, तो एक विशिष्ट व्यक्तित्व, रूप आणि वर्तन असलेली एक व्यक्ती आहे आणि त्याचे नाव ‘ कुत्रा’ ठेवणे म्हणजे त्याच्याशी पूर्णतः अनपेक्षित व्यवहार करणे आहे, असे डॉ. अलेक्झांड्रा म्हणतात.

मग प्लाझ्माचा मोठा गोळा आपल्या ग्रहावरील सर्व जीवसृष्टी शाश्वत टिकवून ठेवतो, असा संदेश देण्याचा तर आपण प्रयत्न करत नाही ना? किती निर्दयी! परंतु बेलॉइट कॉलेजच्या भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ब्रिट शार्रिंगसेन या उलट युक्तिवाद करतात. ‘या महत्वाच्या घटकांनाच नावे नाहीत, हे अजब वाटू शकते. परंतु तुम्ही थोडा विचार केला तर नाव नसण्यातूनच त्यांचे महत्वही अधोरेखित होते. उदाहर्णार्थः चंद्र हा चंद्र आहे. तो केवळ कोणताही चंद्र नाही. त्याला दुसऱ्या नावाची गरजच नाही. कारण तो सर्वात महत्वाचा चंद्र आहे!’, असे डॉ. ब्रिट म्हणतात.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने तर त्याहूनही अगदी सोपे कारण दिले ते असेः गॅलिलिओ गॅलिलीने 1610 मध्ये गुरू ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालणार्या चंद्रांचा शोध लावेपर्यंत तिकडे इतर चंद्रही आहेत, हे आपल्याला माहीतच नव्हते. त्यामुळे आपला चंद्र हा एकमेव चंद्र होताः चंद्र!  चंद्रापासून इतर चंद्र वेगळे करता यावे म्हणून आपण गुरूच्या चंद्रांना युरोपा, कॅलिस्टो आणि गेनीमेड अशी नावे दिली.

सारांश, आपण सूर्याला ‘सूर्य’ म्हणतो आणि चंद्राला ‘चंद्र’ म्हणतो, त्याच कारणास्तव आपण आपल्या पालकांना अजूनही ‘आई’ आणि ‘बाबा’ म्हणतो. हे संबोधन त्यांच्या महत्वापासून वेगळे करताच येत नाही. ते आपल्या जीवनात किती मौलिक भूमिका बजावतात, हेच यातून स्पष्ट होते. ते केवळ कोणताही सूर्य किंवा चंद्र नाहीत, ते फक्त आणि फक्त ‘सूर्य’ आणि ‘चंद्र’च आहेत!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा