राजकीय स्वार्थासाठी प्रतिमापूजन करणाऱ्या भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे १२ विचार पचनी पडणार आहेत का?

0
526
संग्रहित छायाचित्र.
 • न्यूजटाऊन रिसर्च टीम

भारतीय जनता पक्षाच्या नवी मुंबईत सुरू असलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी आणि हिंदू महासभा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक दीनदयाल उपाध्याय यांच्या रांगेत ठेवून भाजप नेत्यांनी उदबत्त्या पेटवल्या. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, भाजप आणि संघाचा हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवादाचा अजेंडा बाबासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दलच्या विचारांच्या अगदीच विपरित आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे याबाबतचे १२ ठळक विचार आम्ही येथे देत आहोत. पक्षाच्या व्यासपीठावर बाबासाहेबांच्या प्रतिमा संघाच्या अनाकोंडाच्या विळख्यात बसवणाऱ्या भाजपला बाबासाहेबांचे हे विचार पचनी पडणार आहेत का? बाबासाहेबांच्या या विचारांची पूजाही संघ- भाजप करणार आहे का?  हे त्यांनी एकदाचे स्पष्ट करून सांगितले पाहिजे.

हिंदुत्व

 • पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की हिंदू समाज हे एक मिथक आहे. हिंदू हे नावच परकीय आहे. येथील मूळ लोकांना आपल्यापासून वेगळे करण्यासाठी ते मोगलांनी दिलेले आहे. मोगलांच्या आक्रमणापूर्वी ते कोणत्याही संस्कृत साहित्यात त आढळत नाही. त्यांना सामान्य नावाची गरजही वाटत नाही, कारण आपण एक समाज म्हणून अस्तित्वात आलेलो आहोत, याची त्यांच्याकडे संकल्पनाच नाही. हिंदू समाज नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. तो जातींचा समूह आहे. प्रत्येक जात आपल्या अस्तित्वाबद्दल सजग आहे. तिचे अस्तित्व हे त्याचे अस्तित्व आहे. या जाती महासंघही तयार करत नाहीत. जोपर्यंत हिंदू- मुस्लिम दंगल होत नाही, तोपर्यंत एका जातीला दुसऱ्या जातीशी संलग्न असल्याची भावनाही नाही. इतर सर्व प्रसंगी प्रत्येक जात स्वतःचे वेगळे अस्तित्व जपते आणि इतर जातीपासून स्वतःला वेगळे करते.
 •  जे बंडखोर पुजाऱ्याच्या तोंडावर युक्तिवाद कऱण्याचे धाडस दाखवतात, आणि तो अचूक नाही, यावर जोर देतात, अशा बंडखोरांची जग स्तुती करते. प्रत्येक प्रागतिक समाजाने त्यांच्या बंडखोरांना श्रेय दिलेच पाहिजे, याची मला अजिबात पर्वा नाही.  हिंदू हे भारतातील आजारी लोक आहेत आणि त्यांच्या आजारपणामुळे  इतर भारतीयांच्या आरोग्य आणि आनंदाला धोका निर्माण झाला आहे, हे हिंदूंना पटवून देऊ शकलो तरीही मी समाधानी होईल.
 • प्रत्येक जात केवळ आपल्यातच जेवते आणि आपल्यातच लग्नही करते असे नाही तर प्रत्येक जातीचा वेगळा असा पोषाखही आहे. भारतीय पुरूष आणि महिला परिधान करत असलेल्या असंख्य शैलीतील पोषाखांबद्दल असे वेगळे कोणते स्पष्टीकरण असू शकते, ज्यामुळे पर्यटकांना आश्चर्य वाटेल? खरे तर आदर्श हिंदू अन्य कोणाशीही संपर्क ठेवण्यास नकार देणाऱ्या स्वतःच्याच बिळात राहणाऱ्या उंदरासारखा असायला हवा. समाजशास्त्रज्ञ ज्याला ‘वागण्याची ढब’ म्हणतात, त्याचाच हिंदूंमध्ये प्रचंड मोठा अभाव आहे. हिंदू म्हणून वागण्याची कोणतीही ढब नाही. प्रत्येक हिंदूमध्ये त्याच्या जातीच्या वागण्याची जी ढब आहे, तिच आहे. त्याच कारणामुळे हिंदूंना समाज किंवा राष्ट्र बनवता येत नाही.
 • मोगलांनी तलवारीच्या जोरावर त्यांच्या धर्माचा प्रसार केला, अशी टीका हिंदू करतात. ते ख्रिश्चनांचीही थट्टा करतात. परंतु खरे सांगायचे तर आमच्यासाठी सर्वात योग्य आणि सन्मानास पात्र कुणी असेल तर ते मोगल आणि ख्रिश्चन आहेत. त्यांनी त्यांच्या सुगतीसाठी अवांच्छित लोकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला किंवा हिंदू जे प्रकाश पेरत नाहीत, जे इतरांना अंधारातच ठेवणे पसंत करतात आणि जे लोकांची आपल्या स्वतःच्या चरित्रस्वभावाचा भाग बनवून घेऊ इच्छितात त्यांच्याशी आपला बौद्धीक आणि सामाजिक वारसा सामायिक करण्याची परवानगी देत नाहीत. मोगल जर क्रूर होते, तर हिंदू नीच आहेत आणि नीचपणा क्रूरतेपेक्षा भयंकर आहे, हे सांगायला मला थोडाही संकोच होत नाही.
 • सोप्या शब्दांत सांगायचे तर, हिंदुत्व आणि सामाजिक संघटन विसंगत आहेत. हिंदुत्व त्याच्या प्रकृतीनुसार सामाजिक विभाजनावर विश्वास ठेवते आणि सामाजिक विभाजनही करते, सामाजिक विघटन हे त्याचे दुसरे नाव. जर हिंदूंना एक व्हायचे असेल तर त्यांनी हिंदुत्वापासून स्वतःला वेगळे केले पाहिजे. हिंदुत्वाचे उल्लंघन केल्याशिवाय ते एक होऊच शकत नाहीत. हिंदुत्व हाच हिंदूंच्या एकतेतील सर्वात मोठा अडथळा आहे. हिंदुत्व सर्व सामाजिक ऐक्याचा आधार असलेली परस्पर संबंधांची उत्कंठा निर्माण करूच शकत नाही. उलट हिंदुत्व विभाजनाची आतुरता निर्माण करते.
 •  हिंदू धर्मात कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळू शकत नाही. हिंदूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वाधीन करून द्यावे लागते. त्याला वेदांनुसारच वागायला हवे. एखादी कृती किंवा निर्देश वेदात सापडत नसेल तर हिंदूला ती स्मृतीकडून घ्यावी लागते. स्मृतींमध्येही ते आढळले नाही तर त्याला महानव्यक्ती चरणी जावे लागते. त्याला कारणही विचारता येत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढा काळ हिंदू धर्मात रहाल, तुम्ही विचार करण्याच्या स्वातंत्र्याची अपेक्षाच बाळगू शकत नाही.
संग्रहित छायाचित्र.

गोमांस भक्षण

 • प्रत्येकाला शाकाहार समजतो. मांसाहारही समजतो. परंतु एखादी मांसाहारी व्यक्ती गायीचे मांस खात असेल तर त्याच्यावर आक्षेप का घेतला जातो, हे समजण्यापलीकडचे आहे. हे विसंग आहे आणि त्याचे स्पष्टीकरण मिळालेच पाहिजे.
 •  …एकेकाळी हिंदू, ब्राह्मण आणि बिगरब्राह्मणही केवळ मांसाहारच करत नव्हते तर बीफ पण खात होते, याबद्दल कोणालाही शंका नाही.
 • बौद्ध भिक्खूंनी जे वर्चस्व प्राप्त केले होते, ते त्यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी ब्राह्मणांनी गायीचे मांस खाणे सोडून दिले, हे ब्राह्मणांनी शाकाहाराचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते.

लोकशाही/ व्यक्तिपूजा

 • इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.

हिंदू राष्ट्रवाद

 • हिंदू राज जर खरेच प्रत्यक्षात आले तर, ती या देशावरील सर्वात मोठी आपत्ती ठरेल, याबाबत अजिबात शंका नाही. हिंदू काहीही म्हणत असले तरी हिंदुत्व हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वासाठी धोकाच आहे. हिंदुत्व लोकशाहीशी विसंगत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हिंदू राज रोखलेच पाहिजे.
 • भारताचा इतिहास दुसरा तिसरा काहीही नसून बुद्धीझम आणि ब्राह्मणीझम यांच्यातील जीवघेणा संघर्ष आहे.

संदर्भ:Dr. B.R. Ambedkar: Writings And Speeches

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा