विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ व १५ डिसेंबरला मुंबईत

0
59
संग्रहित छायाचित्र.

मुंबई कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

एरवी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. मात्र, कोरोना साथीचे संकट लक्षात घेऊन अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आजच्या बैठकीत ७ डिसेंबर ऐवजी १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोNहे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री अ‍ॅड.अनिल परब, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

सरकार चर्चेपासून पळ काढत आहेः राज्य सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचे वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढणाNया घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने ती मागणी अमान्य करत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढते आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा