भीमा कोरेगाव दंगलीतील गुन्हे भाजप सरकारने हेतुतः नोंदवले, तेही मागे घ्या: धनंजय मुंडेंची मागणी

भाजप सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून हेतुपुरस्सर गुन्हे नोंदवले आहेत. ते गुन्हे मागे घेऊन भाजपच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी मागणी परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

0
674
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून हेतुपुरस्सर गुन्हे नोंदवले आहेत. ते गुन्हे मागे घेऊन भाजपच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी मागणी परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. आरे मेट्रो शेडप्रकल्प आणि नाणार प्रकल्पाला विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर धनंजय मुंडे यांनी भीमा कोरेगाव दंगलीतील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली आहे. भाजप सरकारने बुद्धीजीवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निरपराधांना नक्षलवादी ठरवून हेतुतः खटले भरले आहेत. हे हेतुपुरस्सर असून तातडीने हे गुन्हे मागे घेण्यात यावेत. भाजप सरकारच्या कारकिर्दीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याची नेहमीच मुस्कटदाबी केली गेली आहे. सरकारविरोधी आवाज उठवणार्‍यांचा जाणिवपूर्वक छळ करण्यात आला. भाजप सरकारच्या अत्याचारांना बळी पडलेल्यांना न्याय मिळायला हवा, अशी भूमिका धजनंय मुंडे यांनी या पत्रातून मांडली आहे.  भाजप सरकारकडून खटले दाखल झाल्याने अनेक निरपराध सामाजिक कार्यकर्ते अटकेत आहेत किंवा न्यायालयाच्या फेर्‍या मारत आहेत. आपण आरे मेट्रो कारशेड प्रकल्प आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेतले आहेत. त्याच धर्तीवर भीमा कोरेगाव दंगलीतील गुन्हेही तातडीने मागे घेण्याची गरज आहे, असे मुंडे यांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा