धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणारी गायिका महिला वकिलासह पोलिस ठाण्यात

0
437
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणारी गायिका महिला मुंबईच्या डीएन नगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका गायिका महिलेने बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर कोणी आरोप केले म्हणून राजीनामा घेणे योग्य होणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माडंली आहे. अशातच ही महिला डीएन नगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यामुळे या घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या महिलेचा डीएन नगर पोलिस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. डीएन नगर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त ज्योत्सना रासम यांच्या देखरेखीखाली हा जबाब नोंदवला जाणार असून ही महिला तिच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती जबाबात देणार आहे. यापूर्वी या महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचाः धनंजय मुंडेंची आमदारकी गेली तर….परळीत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

धनंजय मुंडेंवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करणारी ही महिला तिच्या वकिलाला सोबत घेऊन पोलिस ठाण्यात गेली आहे. त्यापूर्वी या महिलेने धनंजय मुंडेविरोधात लेखी तक्रारही दाखल केली आहे. ही महिला सहायक पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळेत आहे. या नवीन घडामोडीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लागले आहे.

डीएन नगर पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी या महिलेने एक ट्विट केले आहे. परेशानियां मुश्किले जरूर आती है लेकिन सच नही हारता, असे या महिलेने ट्विटमध्ये म्हटले आहे. एकंदरच धनंजय मुंडे प्रकरण चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत वेगवान राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा