औरंगाबादेत दिरानेच केला भावजयीवर बलात्कार, भावाशी जुळवून देण्याचे दाखवले आमिष

0
1487
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः पतीसोबत समेट घडवून आणण्याचे आमिष दाखवून दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पतीशी समेट घडवून आणतो असे सांगून दिराने भावजयीला ४ ते ५ ऑक्टोबर २०२० या काळात शहरात आणले. आणि तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार  आईवडिलांना सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

दिराने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे घाबरलेल्या पीडितेने काही दिवस मौन पाळले. अखेर बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक म्हस्के करत आहेत.

पीडित महिला ही ग्रामीण भागातील आहे. तिचा आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरू होता. हीच संधी साधून दिराने तिला भावाशी समेट घडवून आणण्याचे आमिष दाखवून शहरात आणले आणि हे दुष्कृत्य केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा