हिंगणघाटमध्ये तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळले, पीडित तरूणी शिक्षिका असल्याची माहिती

0
492
प्रतिकात्मक छायाचित्र.

वर्धा: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळल्याची धक्कादायक घटना वर्धाजिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. आरोपीने हे कृत्य केल्यानंतर तो तिथून तत्काळ पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे हिंगणघाटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षिका असल्याचे समजते. नेहमी प्रमाणे ती कामावर जाण्यासाठी लगबगीने घराबाहेर निघाली. आरोपी तिच्या मागावरच होता. जशी ही तरूणी हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचली. तसे संधी साधून आरोपीने सोबत आणलेले आणि पेट्रोल तिच्या अंगावर टाकले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर जराही न थांबता हा आरोपी तिथून फरार झाला. आरडोओरडा ऐकून आजुबाजूच्या लोकांनी तातडीने पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले. या तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा