पॉर्न फिल्म बघत ‘वाइल्ड सेक्स’ करणे जिवावर बेतले, गळफास लागून तरूणाचा मृत्यू

0
2581
संग्रहित छायाचित्र.

नागपूरः मोबाइल पॉर्न फिल्म पहात वेगवेगळ्या पद्धतीने ‘वाइल्ड सेक्स’ करणे एका तरूणाच्या जिवावर बेतले आहे. या नादात तरूणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

व्यवसायाने अभियंता असलेल्या आणि सध्या बेरोजगार असलेला २७ वर्षीय तरूण आणि त्याची २० वर्षीय मैत्रीण यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी हे दोघे जण खापरखेडा परिसरातील महाराजावर गेले. तेथे त्यांनी एक रुम बुक केली होती. त्यानंतर त्या दोघांनी मोबाइलवर पॉर्न फिल्म बघत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मोबाइलवर पॉर्न फिल्म बघत त्यांनी ‘वाइल्ड सेक्स’ करताना दोरीचा वापर केला. वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध करण्यासाठी तरूण खुर्चीवर बसला. दोरीने त्याचे हातपाय बांधण्यात आले. तिच दोर त्याच्या गळ्याभोवती बांधण्यात आली.

थोड्यावेळाने तरूणी बाथरुमला गेली आणि तो अभियंता तरूण खुर्चीवरून खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या गळ्याला बांधलेली दोर आवळली गेली. बाथरूमला गेलेली तरुणी बाहेर येईपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. तरुणीने लगेच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकाला दिली. लॉज व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला असून या घटनेचा तपास सुरु केला आहे. या विचित्र घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी लॉज व्यवस्थापकासह तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरु केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा