ज्येष्ठ कवी बी.रघुनाथ यांच्या जयंतीनिमित्त उद्या युवा काव्यसंध्या

0
87

औरंगाबाद: मराठवाड्याचे भूषण असलेले ज्येष्ठ कवी बी.रघुनाथ यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व अभ्युदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा काव्यसंध्या या ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.बी.रघुनाथ यांच्या जयंतीदिनी सोमवार ७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वा या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रसारण झूम अँप,प्रतिष्ठानचे अधिकृत फेसबुक पेज www.facebook/ybchavanpratishthan  व यूट्यूब चॅनेलवर होणार आहे. इच्छुकांना www.facebook/ycp100 या लॉगइन आयडीवर या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा.डॉ.कैलास अंभुरे हे ‘बी.रघुनाथ व त्यांची कविता’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. त्यानंतर सुरू होणाऱ्या युवा काव्यसंध्येत मराठवाड्यातील युवा नामवंत कवी डॉ.स्वप्नील चौधरी,धम्मपाल जाधव,गुंजन पाटील, नीलेश चव्हाण, गणेश घुले, भाग्यश्री वाघमारे आपल्या कविता सादर करतील. या कविसंमेलनाचे निवेदन महेश अचिंतलवार करतील.

रसिकांनी या ऑनलाइन उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सल्लागार नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, सदस्य प्रा.अजीत दळवी, डॉ.भालचंद्र कांगो, डॉ.श्रीरंग देशपांडे, डॉ.दासू वैद्य, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.अपर्णा कक्कड, डॉ.रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, डॉ.आनंद निकाळजे, शिव कदम, सुबोध जाधव, श्रीकांत देशपांडे, रेणुका कड, मंगेश निरंतर आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा