रक्तगटाचा जनक कार्ल लँडस्टेनर

0
98
संग्रहित छायाचित्र.
  • हेमकांत सोनार, अलिबाग-रायगड

१४ जून डॉ. कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म दिवस. हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून  जगात तसेच आपल्या देशात साजरा केला जातो. रक्तगटाचा जनक डॉ. कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म १४ जून १८६८ साली  व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया येथे झाला. कार्ल लँडस्टेनर यांचे शिक्षण व्हिएन्ना (ऑस्ट्रेलिया) येथील शाळेत झाले. सुरुवातीपासूनच त्यांना वैद्यकीय शिक्षणाबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी व्हिएन्ना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन १८९१ साली कार्ललँडस्टेनर यांना वैद्यकीय पदवी मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी जीवरसायन शास्त्रातील मुलभूत प्रक्रियांचा खास अभ्यास केला.

डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी अन्नाचा रक्तातील घटकांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून आपल्या संशोधकांचा पाया रचला. पुढील पाच वर्षे रसायनशास्त्राचा अभ्यास करीत त्यांनी इमिल, फिश्चर, वुझबर्ग व बँम्बर्गर, म्युनिच अशा संशोधकांसोबत अभ्यास करून झुरीच येथील हेन्ट्स प्रयोगशाळेत संशोधन केले. पुढे त्यांनी व्हिएन्ना येथील सार्वजनिक रुग्णालयात नोकरी केली व तेथेच आरोग्य विज्ञानाचा अभ्यास सुरु केला. सन १८९६ मध्ये मॅक्स ग्रुबूर यांचे सहायक म्हणून डॉ. कार्ल लँडस्टेनर यांची नियुक्ती झाली.

शरीरात रक्त व त्यांचे इतर घटक यामुळेच शरीरातील अनेक प्रक्रिया चालतात. सर्व शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा रक्तपेशींमुळेच होतो. शिवाय रोगप्रतिकारशक्तीही रक्तातील लढवय्या पेशींमुळे चालू असते. मानवाच्या शरीरात ए, बी, एबी, ओ असे चार प्रकारचे रक्तगट असतात. तसेच आर. एच. फॅक्टर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे दोन प्रकार आहे.

ए,बी, ओ या रक्तगटाचा शोध डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी १९०० साली लावला. तसेच आर. एच. फॅक्टर शोध आणि सन १९०९ साली पोलिओ विषाणूचा शोध लावून त्यांनी जगात प्रसिद्धी मिळविली. त्यांच्या या शोधासाठी योगदानाबद्दल त्यांना १९३० साली आरोग्य व औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.  याचबरोबर १९०२ साली ‘एबी’ या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. सन १९४० साली डॉ. कार्ल लँडस्टेनर व ए.एस. व्हिनेर (Weiner) यांनी Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला Rh (आरएच) फॅक्टर असे नाव दिले. अशा प्रकारे डॉ. कार्ल लँडस्टेनर यांच्या योगदानाबद्दल त्यांना रक्तगटाचा जनक म्हणतात.

महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोज ४  ते ५ हजार रुग्णांना रक्ताची गरज भासते. मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे रक्तदाता हा रुग्णांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो. याकरिता सोशल डिस्टन्सिंग व योग्य काळजी घेऊन रक्तदान शिबीर आयोजित करून रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा केला जाऊ शकतो. यासाठी रक्तदात्यांनी योग्य काळजी व सोशल डिस्टन्सिंगचा योग्य वापर करून रुग्णांसाठी जवळच्या अथवा आयोजित ऐच्छिक रक्तदान शिबिरात पुढाकार घेऊन स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जोपासावी. कोरोना विषाणूची भीती न बाळगता योग्य काळजी घेऊन व सोशल डिस्टन्सिंग ठेवून ‘रक्तदाता’ म्हणून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान करावे, हे नम्र आवाहन..!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा