कोरोनाची मिठीः औरंगाबादेत पुन्हा १२ रुग्ण वाढले, शनिवारी दिवसभरात ४०, एकूण रूग्णसंख्या २५६

0
170
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः झपाट्याने वाढणारे शहर असा एकेकाळी लौकिक मिळवणाऱ्या औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या आठवडाभरापासून झपाट्याने वाढत चालली आहे. शनिवारी दिवसभरात २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यात आणखी १२ नवीन रूग्णांची भर पडली. दिवसभरातील २८ आणि रात्री उशिरापर्यंत आढळलेले १२ असे ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण शनिवारी एकाच दिवशी आढळून आले आहेत. रूग्ण आढळण्याची ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २५६ झाली आहे.

शनिवारी रात्री आढळून आलेल्या १२ रुग्णांपैकी तब्बल ११ रूग्ण एकट्या जयभीम नगरातील आहेत तर एक रूग्ण नंदनवन कॉलनीतील आहे. शनिवारी दिवसभरात औरंगाबाद शहरातील नूर कॉलनीत ५, कैलासनगरमध्ये ३, बायजीपुऱ्यात ११,  समता नगरमध्ये २ , जयभीम नगरमध्ये १, किल्ले अर्कमध्ये २, टाऊन हॉल परिसरात २, गौतम बुद्ध नगरात १ , संजय नगरात १ असे एकूण २८ रूग्ण आढळून आले होते. शनिवारी रात्री त्यात आणखी १२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शनिवारी एकाच दिवसात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ४० झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा