आरोग्य क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्ती कोरोना योद्धे होण्यास तयार

0
14
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाविरुद्ध युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना केलेल्या  आवाहनला चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यातील तब्बल २१ हजार जणांनी कोरोना योद्धे होण्याची तयारी दाखवली आहे. आता या इच्छुकांच्या अर्जांची छाननी करून ते अर्ज त्या त्या जिल्हयांकडे सोपवण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मिडीयावरील लाइव्ह संवादात डॉक्टर्स, आरोग्य सेवेते काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण घेतलेले परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे नियुक्ती न मिळालेल्या व्यक्तींना कोरोना योद्धे म्हणून कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाचच दिवसांत २१ हजार जणांनी कोरोना योद्धे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यात ९४३ डॉक्टर्स, ३३१२ पचारिका, ११४१ फार्मासिस्ट, ८६३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ७६६ वॉर्डबॉय, ६१४ पॅरा वैद्यकीय, ५६९ इतर वैद्यकीय आणि सैन्यातून निवृत्त झालेल्या ७६ जणांचा समावेश आहे. या सर्वांना गुगल फॉर्म देण्यात आला होता. त्यापैकी १८ हजार व्यक्तींनी अर्ज भरून दिले असून त्यांना आवश्यकतेनुसार विविध जिल्ह्यांत पाठवण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा