लॉकडाऊनच्या काळात २४१ सायबर गुन्हे दाखल

0
10
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.  

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मिडीयावर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत.

यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १९, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, पुणे शहर ४, गोंदिया ४, ठाणे ग्रामीण ४, सोलापूर शहर ३, रायगड २, हिंगोली २, वाशिम १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११० तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडीओ शेअरप्रकरणी ४ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे. ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा