लॉकडाऊन कालावधीत आतापर्यंत राज्यात ५७ हजार गुन्हे दाखल, १२ हजार व्यक्तींना अटक

0
30
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८  नुसार ५७,५१५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १२,१२३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत ४०,४१४ वाहने वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली.

या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ७३,३४४ फोन आले. त्या सर्वांची दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे, अशा ५७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०५१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.

राज्यभरात गुन्ह्यांसाठी २ कोटी २० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या कालावधीत आतापर्यंत पोलिसांवर हल्ल्याच्या ११७ घटना घडल्या असून या प्रकरणी ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

११ अधिकारी, ३८ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधाः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारीही २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना ११ पोलीस अधिकारी व ३८ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा