आरोग्य सेतु ऍप म्हणजे लपून चोरून निगरानी करणारे जुगाडः राहुल गांधींनी व्यक्त केली शंका

0
232

नवी दिल्लीः कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने विकसित केलेले आरोग्य सेतु ऍप म्हणजे लपून चोरून लोकांवर निगरानी ठेवण्याचे जुगाड असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.या ऍपच्या माध्यमातून लोकांचा खासगी डेटा चोरी होण्याची आणि गोपनीयतेचे उल्लंघन होण्याची शंकाही राहुल गांधी यांनी घेतली आहे.

आरोग्य सेतु एक अत्याधुनिक निगराणी प्रणाली आहे. ही प्रणाली एका खासगी ऑपरेटरला आऊटसोर्स करण्यात आली आहे. त्यात कोणतीही संस्थात्मक पडताळणी नाही. त्यामुळे डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. तंत्रज्ञान आम्हाला सुरक्षित ठेवण्यास सहाय्यक ठरू शकते परंतु नागरिकांच्या सहमतीशिवाय त्यांच्यावर नजर ठेवली जाण्याची भीती असता कामा नये, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही आरोग्य सेतु ऍपच्या मुद्यावर मोदी आणि योगी सरकारवर टिकास्त्र सोडले होते. जेव्हा जनता त्राहीमाम करत आहे. रेशन, पाणी, रोख रकमेची टंचाई आहे आणि सरकारी अधिकारी सर्वांकडून शंभर-शंभर रूपये पीएम केअर्ससाठी वसूल करत आहेत. तेव्हा सर्व बाजूंनी पीएम केअर्सचे सरकारी ऑडिटही झाले पाहिजे. देशातून पळून गेलेल्या चोरांचे ६८,००० कोटी रुपये माफ झाले, त्याचाही हिशेब झाला पाहिजे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा