राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५,६४९, १८ मृत्यू; ७८९ रुग्ण उपचारानंतर घरी परतले!

0
22

मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाबाधित ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात बुधवारी १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १ आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 बुधवारी झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५  रुग्ण आहेत तर १२  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा