शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीला खासदारकीची पेन्शन!

0
1260
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने योगदान देत असतानाच औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपलीवर वर्षभराची खासदारकीची उर्वरित पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन नवा पायंडा पाडला आहे. एखाद्या माजी खासदाराने पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपली पेन्शन देण्याची ही पहिलीच घटना ठरावी.

चंद्रकांत खैरे यांनी १९९९ पासून २०१९ पर्यंत सलग चार वेळा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तिजाय जलील यांनी त्यांचा पराभव केला होता. माजी खासदार झाल्यामुळे त्यांना मे २०१९ पासून खासदारकीची पेन्शन सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वर्षभराची खासदारकीची पेन्शन मुखमंत्री सहायता निधीला देऊन टाकली आहे. लोकसभा निवडणुका होऊन १२ महिने होऊन गेले आहेत. खैरे यांच्या मे २०१९ ते एप्रिल २०२० या वर्षभराच्या कालवाधीतील पेन्शची रक्कम ५ लाख ९३ हजार २५९ रुपये इतकी होते. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे खैरे यांनी पेन्शनचा धनादेश आज सुपूर्द केला आहे.

माजी खासदार खैरे यांनी पुढाकार घेऊन आपली खासदारकीची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपली पेन्शन देणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच माजी खासदार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा