राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने औरंगाबादेत कोरोना योद्ध्यांसाठी दिले एक हजार फेसशिल्ड!

0
223

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने फेसशिल्ड उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला आहे. आज औरंगाबादेत इंडियन मेडिकल असोसिएशनशी( आयएमए) सर्व संलग्नित डॉक्टरांसाठी १ हजार फेसशिल्ड देण्यात आल्या.

 महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढत चाललेला असतानाच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि जोखीम पत्करून कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करत आहेत. उपचार करताना त्यांच्याही सुरक्षिततेची खबरदारी घेणे आवश्यक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राज्यभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी फेसशिल्ड्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते निलेश राऊत यांच्या हस्ते आयएमएशी संलग्नित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी १ हजार फेसशिल्ड्स देण्यात आल्या.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या नियोजनात राज्यातील हजारो डॉक्टर व कर्मचाऱ्यांना हे फेसशिल्ड देण्यात आलले आहेत. आजच्या वितरण प्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. रंजलकर, सचिव डॉ.यशवंत गाडे, डॉ.सबनीस, उपाध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळे उपस्थित होते. फेसशिल्ड्स वितरणाकरता राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.धैर्यशील पवार ,प्रदेश सरचिटणीस डॉ.एस.पी. मोहिते, डॉ.रंगनाथ काळे, डॉ.अक्षय बाभूळगावकर, डॉ.गणेश वाघ, डॉ.लघाने पाटील, डॉ.बने, डॉ.चौधर, डॉ.वनारसे हे परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा