घोर वाढलाः औरंगाबादेत आज दिवसभरात १०४ कोरोना पॉझिटिव्ह, ४ रूग्णांचा मृत्यू

0
336
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोना बाधितांची रूग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली असून आज दिवसभरात १०४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ९९ झाली आहे. औरंगाबादेत मध्यंतरी कमी झालेली रूग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच औरंगाबादकरांचीही चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९५० कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजार १८४ रूग्ण उपचारानंतर घरी गेले असून सध्या ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये हर्सूल तुरूंगातील २९, रोशन गेट परिसरात ६, पीर बाजार-उस्मानपुरा भागात ४, हुसेन कॉलनीत ३, गारखेडा परिसरात ३, संजय नगरमध्ये ३, लेबर कॉलनीत ३ रूग्णांचा समावेश आहे.  आज आढळलेल्या रूग्णांमध्ये ८१ पुरूष आणि २३ महिलांचा समावेश आहे. अन्य रूग्णांचा तपशील असाः  

या भागात प्रत्येकी २ रूग्णः भवानी नगर, मिल कॉर्नर, एन-आठ सिडको, एन-११टी.व्ही सेंटर, भीमनगर-भावसिंगपुरा, शिवशंकर कॉलनी, आंबेडकर नगर, नॅशनल कॉलनी, जय भीम नगर, शरीफ कॉलनी-रोशन गेट.

या भागात प्रत्येकी एक रूग्णः राधास्वामी कॉलनी, भारतमाता नगर, एन-१२, हर्सूल परिसर, अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर, न्याय नगर, कैलास नगर, बीड बायपास रोड, हनुमान नगर , गादिया विहार-शंभू नगर, तोफखाना-छावणी, जुनी मुकुंदवाडी, पद्मपुरा, समता नगर, युनुस कॉलनी, जुना बाजार, गौतम नगर, देवडी बाजार, वेदांत नगर, बुद्ध नगर-जवाहर कॉलनी, अल्तमश कॉलनी, पैठण गेट,  रेहमानिया कॉलनी, पिसादेवी रोड, पुंडलिक नगर,  गल्ली नं. १८-जहागीरदार कॉलनी-रेल्वे स्टेशन परिसर, उत्तम नगर, बारुदगरनाला-औरंगपुरा, जिन्सी, सादात नगर, घाटी परिसर आणि गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव देवशी.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) चंपा चौकातील ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा पाच जून रोजी दुपारी ३.१५ वाजता, सवेरा पार्क, हर्सूल येथील ७० वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा पाच जून रोजी रात्री ९.३० वाजता, किराडपुरा येथील ५० वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्णाचा आज सकाळी ६.१० वाजता व जटवाडा रोड, हर्सूल परिसर  येथील ६२ वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा दुपारी २.२५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९९ झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा