केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यांसाठी ८ रुपये किलो गहू, १२ रुपये किलो दराने तांदूळ

0
239
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील केशरी रेशनकार्डधारकांना  मे आणि जून या दोन महिन्यांसाठी ८ किलो गहू आणि १२ रुपये तांदूळ अशा सवलतीच्या दराने प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य वाटप करण्यात येणार असून त्यांना लवकरात लवकर या सवलतीचा लाभ द्यावा, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या १४ जिल्ह्यांतील एकूण ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना म्हणजेच ३ कोटी ८ लक्ष ४४ हजार ७६ नागरिकांना मे व जून, २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात यावा असे आदेश भुजबळ यांनी राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.  भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयातून राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केशरी रेशनकार्डधारकांना ९२ हजार ५३२ मेट्रिक टन गहू आणि ६१ हजार ६८८ मेट्रिक टन  तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. केशरी रेशनकार्डधारकांना गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता वितरित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा