सीएसआर निधीतून योगदानासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते

0
51
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून निधी उभारण्यात येत आहे. यासाठी आता सरकारने ‘महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडले असून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

साथीच्या रोगाच्या समस्येने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र सरकारला मदत देण्यासाठी उत्स्फूर्त आणि असंख्य विनंत्या प्राप्त होत आहेत. या विनंतीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ या नावाने स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, कुलाबा, मुंबई येथे उघडले आहे. आपत्तीचा सामना समर्थपणे करण्यासाठी हा निधी/फंड राज्यास निश्चितपणे उपयक्त ठरेल. उद्योगांचे सामाजिक दायित्व निधीमधून (Corporate Social Responsibility) उद्योग जगताकडून भरघोस निधी या खात्यामध्ये देणगीद्वारे जमा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या खात्यात जमा करण्यात येणारा निधी कंपनी अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार सीएसआर साठी पात्र आहे.

बँक खात्याचा तपशील असा:
खात्याचे नावः  महाराष्ट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी
बँक खाते क्रमांकः 39265578866
बँकेचे नावः स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई
ब्रँच कोडः 572
आयएफएससी (IFSC):SBIN0000572
एमआयसीआर (MICR): 400002087

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा