सैयदना बुरहानी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत

0
110

मुंबई: सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर एडल वाइज कंपनीतर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत २५१ कोटी रुपये जमा झाले आहेत. दाऊदी बोहरा समाजाच्यावतीने देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत ८ लाख ३३ हजार २४३ लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचेही ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणुच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा