अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता

0
18
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एसटीचे कर्मचारीही आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला  प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली.

२३ मार्चपासून पुढील तीन आठवडे संपूर्ण देशात लॉक-डाऊन जाहीर करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व  व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांत अत्यावश्यक सेवेत कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी सरकारने एसटी महामंडळावर टाकली. त्यानुसार २३ मार्चपासून  मुंबई  व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या  बसेसद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेत कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत  आहेत, असे परब म्हणाले.

एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे, पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती परब यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा