देशातील २७४ जिल्ह्यांत कोरोनाचा फैलाव; ३,६२४ पॉझिटिव्ह रूग्ण, १०६ जणांचा मृत्यू

0
33
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील २७४ जिल्ह्यांत कोरोना विषाणूने हातपाय पसरले असून गेल्या २४ तासांत ४७२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने देशातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची ३,६२४ झाली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाने १०६ जणांचे बळी घेतले आहेत.

कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून त्या खालोखाल मृतांची संख्या गुजरातमध्ये आहे. देशातील ७३६ जिल्ह्यांपैकी तब्बल २७४ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला असून हे प्रमाण ३७.२२ टक्के इतके आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी २८४ जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 कोरोना फैलाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कटाक्षाने सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा सध्या तरी उत्तम मार्ग असून नागरिकांनी गर्दी टाळावी, घरात राहून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा