निवृत्तीवेतनधारकांचे अभिलेखे पडताळणी सुरू, माहिती पाठवण्याचे आवाहन

0
283
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अपडेटेशनचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठवण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे.

अधिदान व लेखा कार्यालयामार्फत माजी विधानसभा/विधानपरिषद सदस्य, माजी आयएएस/आयपीएस अधिकारी तसेच राज्य शासनाचे निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना दरमहा निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाते. निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन धारकाचा पीपीओ क्रमांक, जन्मतारीख, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, सध्याचा पत्ता अशी आठ मुद्द्यांवरील माहिती पाठविणे अपेक्षित आहे.

मुंबई शहरातील निवृत्ती वेतन धारकांनी आपली माहिती १० जून ते ३० जूनपर्यंत तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांनी १ जुलै ते ३० जुलैपर्यंत paopension1@gmail.com या ईमेलवर अथवा लेखा कोष भवन, ए विंग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१ या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा