दिवाळीत तयार होणाऱ्या मिठाईवर ’एक्स्पायरी डेट’ बंधनकारक

0
24
संग्रहित छायाचित्र.

मुंबई दुकानदारांनो दिवाळीत मिठाईची विक्री करताना  सावधान…दिवाळीत तयार होत असलेली मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थांवर यापुढे ते करण्याची तारीख आणि एक्सपायरी डेट या दोन्ही तारखा टाकणे बंधनकारक केले आहे. अशा पदार्थांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून ’वॉच’ ठेवला जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची जोरदार खरेदी सुरु असते. मात्र, नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष आहे. जनतेला सकस आणि चांगले अन्न दिवाळीच्या काळात मिळाले पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे, असे डॉ. शिंगणे म्हणाले.

संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावर कोरोना महामारीचे संकट असून अजूनही ते संकट पूर्णपणे टळलेले नाही. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सर्वधर्मियांनी सण अतिशय शांततेने आणि घरातच साजरे केले. दिवाळीसुद्धा प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहन करत डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा