महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक: वाचा संपूर्ण यादी

0
313
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची  घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.देशातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, 286 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर 93 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक: महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.

 शौर्य पदक:  1. मिठू नामदेव जगदाळे, 2. सुरपत बावाजी वड्डे, 3. आशिष मारूती हलामी, 4. विनोद राऊत, 5. नंदकुमार अग्रे, 6. डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, 7. समीरसिंह साळवे, 8. अविनाश कांबळे, 9.  वसंत अत्राम, 10. हमीत डोंगरे.

विशिष्ठ सेवा पदक: 1. अर्चना त्यागी (आयपीएस), 2. संजय सक्सेना (आयपीएस), 3.  शशांक सांडभोर (सहा.पोलीस आयुक्त), 4. वसंत साबळे (सहा.पोलीस निरिक्षक).

गुणवत्ता सेवा पदक : 1. धनंजय कुलकर्णी (पोलीस अधीक्षक), 2. नंदकुमार ठाकुर (पोलीस उपायुक्त, मुंबई), 3. अतुल पाटील (अतिरिक्त आयुक्त मुंबई), 4. नंदकिशोर मोरे (सहायक आयुक्त, मुंबई), 5. स्टीव्हन मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), 6. निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), 7.  चंद्रशेखर सावंत (उपाधीक्षक, अकोला), 8.  मिलिंद तोतरे (निरिक्षक, नागपूर), 9.  सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), 10.  मुकुंद पवार (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई) 11. संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), 12. कायोमर्ज बोमन इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), 13. गजानन काबदुले (वरिष्‍ठ निरिक्षक, मुंबई शहर), 14.  निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), 15.  इंद्रजीत कारले (सहा.आयुक्त ठाणे) 16. गौतम पातारे (निरिक्षक औरंगाबाद), 17.  सुभाष भुजंग (निरिक्षक जालना), 18.  सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), 19. किसन गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई),  20. जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), 21. मधुकर चौगुले (उपनिरिक्षक, गगनबावडा, कोल्हापूर), 22.श्री. भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), 23.  राजू अवताडे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, अकोला), 24. शशिकांत लोखंडे (सहा.पोलीस निरिक्षक, मुंबई), 25. अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), 26. वसंत तराटे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मुंबई शहर), 27. रविंद्र नुल्ले (सहा.पोलिस उपनिरिक्षक, कोल्हापूर), 28. मेहबूबअली सय्यद (सहा.पोलीस उपनिरिक्षक, नाशिक शहर), 29.  साहेबराव राठोड (सहा.पोलीस उपनिरिक्षक), 30. दशरथ चिंचकर (सहा.पोलीस उपनिरिक्षक, मावळ, पुणे) 31.  लक्ष्मण टेंभुर्णे (सहा.पोलीस उपनिरिक्षक, गडचिरोली), 32.  बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक, नागपूर शहर), 33. विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), 34. प्रदीप जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), 35. चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक, जळगांव), 36. भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), 37. नितिन मालप (इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), 38.  रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), 39.  बाबुराव बिऱ्हाडे (इंटिलीजन्स अधिकारी, नाशिक), 40. संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक).

महाराष्ट्राला 5 जीवन रक्षा पदक: संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहीर झाले आहे. मुंबईतील कमला मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते.जीवन रक्षा पदक जाहीर झालेल्यामध्ये 1. श्री.एन.कार्तिकेयन, 2. कुमारीप्रमोद बाळासाहेब देवडे, 3. मास्टर शिवराज रामचंद्र भांडारवड, 4. श्री.दत्तात्रय सुरेश टेंगळे यांचा समावेश आहे.

अग्निशमन सेवा पदक:   अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 7 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये प्रभात सुरजलाल रहांगदळे (मुख्य अग्निशमन अधिकारी), 2. राजेंद्र चौधरी (उपमुख्य अधिकारी), 3. रविंद्र अंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), 4. मिलिंद दोंडे (सहाय्यक अग्निशमन अधिकारी), 5.  अभिजीत सावंत (स्टेशन अधिकारी), 6.  सुधीर वर्तक (वाहनचालक), 7. दिलीप पालव (उपमुख्य अग्निशमन अधिकारी) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा