खुली विक्री होणाऱ्या मिठाईवरही येणार आता एक्सपायरी डेट, मिठाईच्या ट्रेवर पाटी बंधनकारक !

0
91
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मिठाईच्या दुकानांत विकली जाणारी खुली मिठाई म्हणजेच बर्फी, पेढे, गुलाब जामून, रसगुल्ले यांच्यासह सर्व प्रकारच्या गोड पदार्थांची विक्रेत्यांना एक्सपायरी तारीख सांगणे बंधनकारक होणार आहे. ही मिठाई कधी तयार करण्यात आली आणि ती कधीपर्यंत वापरता येणार आहे, याची माहिती देणारी पाटीच त्या मिठाईच्या ट्रेवर लावल्याशिवाय विक्रेत्यांना मिठाई विकता येणार नाही. १ जून २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.

  अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदींनुसार अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या संबंधीचा आदेश जारी केला आहे. बंद पाकिटातील मिठाईऐवजी खुली मिठाई घेणेच अनेकजण पसंद करतात. मात्र ही खुली मिठाई खूप दिवसांची असेल तर आपल्या प्रकृतीवर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते. म्हणून अन्न सुरक्षा प्राधिकरणाने हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार सुटी मिठाई विकताना ती कधी तयार केली आणि कधीपर्यंत वापरण्यायोग्य आहे, याची स्पष्ट माहिती देणारी पाटी त्या त्या मिठाईच्या ट्रेवर लावावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा