आनंदी जिवनाचे रहस्य : पहाटे ४ पूर्वी उठणारे लोक नेमके काय करतात?

0
195

अनेकदा ठरवूनही पहाटे उठणेच होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. परंतु अरूणोदयापूर्वी उठणे ही तुम्ही समजता त्यापेक्षा खूपच सर्वसमान्य बाब आहे. पहाटे उठणे हे व्यायाम, आत्मसुधारणा आणि वन्यजीव निरीक्षणासाठी ही उत्तम वेळ आहे..

भल्या पहाटे उठून व्यायाम करायचा, फिरायला जायचे पण जागच येत नाही. प्रत्येकाचे असेच होत असणार, असे आपण गृहीत धरलेले असते. परंतु पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वी स्वेच्छेने उठणारात काही मूठभर सीईओ आणि तुमचं म्याँव म्याँव करत झोपेचे खोबरे करणारे मांजर एवढेच आहेत, असे तुम्ही समजत असाल ते चुकीचे आहे. नुकत्याच झालेल्या एका अध्ययनानुसार, प्रत्येक ३०० व्यक्तींमधील एक व्यक्ती नैसर्गिकरित्या पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वीच उठते. ही बाब सर्वसामान्य वाटत नसली तरी इच्छा असूनही ज्यांना सकाळी ८ वाजताही झोपेतून उठणे जमत नाही, अशांच्या विचारापलीकडची नक्कीच आहे.

कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील न्यूरॉलॉजीचे प्रोफेसर लुईस प्टासेक यांची पहाटे एक किंवा दोन वाजता नित्यनेमाने उठणाऱ्या एका महिलेची भेट झाली. एवढ्या भल्या पहाटे उठण्याच्या सवयीमुळे मी एकाकी आणि दुःखी झाले, असे त्या महिलेने प्टासेक यांना सांगितले. तिच्यात नैराश्य आले. वेळ भरून काढण्यासाठी ती अनेकदा पहाटे चार वाजताच व्हॅक्युम करत बसते. या महिलेच्या भेटीनंतर सलग २० वर्षे भल्या पहाटे उठणाऱ्या माणसांची जीवनशैली नेमकी असते तरी कशी, हे जाणून घेण्याची प्टासेक यांची इच्छा झाली.

भल्या पहाटे उठणाऱ्या अन्य लोकांसाठी मात्र ही वेळ अत्यंत आल्हादादायक असते. ते या वेळेत ध्यानधारणा, व्यायाम यासारख्या स्वयंसुधारणेत घालवतात. हॉलीवूड अभिनेता मार्क वहलबर्ग याने आपण पहाटे अडीच वाजता उठून प्रार्थना करतो आणि त्यानंतर व्यायाम करतो, असा दावा केल्यानंतर गेल्या वर्षी त्यावर ऑनलाइन भरपूर चर्चा रंगली होती. पण रात्री ते 7.30 वाजता व्हालबर्ग न चुकता आपल्या बिछान्यात असतात.

भल्या पहाटे उठणारे सर्वच जण काही शिफ्टमध्ये काम करणारे कामगार नसतात. पहाटे दिवसाची सुरूवात करून कामाचा ताण हलका करून घेणे हा अनेकांचा नित्यक्रम असतो. धकाधकीचे कामकाज असलेल्या कार्यालयात काम करणारे लोक भल्या पहाटे उठून वर्कआऊट करतात, नाश्ता करतात आणि सकाळी सात वाजता तर आपल्या कार्यालयातील डेस्कवर पोहोचलेलेही असतात. लोक आपणाला जे सोयीचे असते, त्याप्रमाणे आपले श्येड्यूल निश्चित करतात.

’सिम्पल टिप्स, स्मार्ड आयडियाजच्या लेखिका आणि बिझनेस कन्सल्टंट इरिका वूल्फ मुरे साधारणपणे पहाटे ४.४५ वाजता उठतात. पहाटे उठल्यानंतर मी बरीच कामे आटोपून घेते. माझ्या विचारांबाबत मला खूपच स्पष्टता झालेली असते. माझी बहुतेक पुस्तके पहाटे ४.३० वाजेपासूनच लिहून झालेली आहेत. मी दररोज दोन तास लेखन करते. त्यानंतर वर्कआऊटला जाते किंवा उन्हाळ्यात वॉकिंग करते, असे इरिका सांगतात.

अभिनेत्यांपासून ते सिलिकॉन व्हॅलीतील सीईओंपर्यंत, काही अतियशस्वी लोक हे दिवसात जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून अगदी भलत्या वेळी उठून दिवसाची सुरुवात करतात. त्यातून ऊर्जा मिळते. दिवसभर ताजेतवानेपणा टिकून राहातो. कामाचा उरक वाढतो.असे असले तरी मानसिक आणि व्यावहारिकदृष्या तुम्ही तुमच्या शरीरचक्राशी तुमचे वेळापत्रक जुळवून घेणे तुमच्यासाठी सर्वोत्तम असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा