सांध्यांची काळजी घेण्याचे ५ उत्तम मार्ग

0
179

दिवसभर उत्साही राहाण्यासाठी केवळ स्ट्रेचिंग पुरेसे नाही. त्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, चांगले पोश्चर आणि तुमच्या आहारातील बदलही तितकेच आवश्यक आहेत…

निरोगी वजन ठेवा :

तुमचे वजन जेवढे जास्त, तेवढा तुमच्या सांध्यांवर ताण आणि तुमच्या सशक्त स्नायूंना तुमच्या हालचाली नियंत्रित कराव्या लागतात, असे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट लॉरा जेमीसन सांगतात. स्नायूंचा सशक्तपणा टिकवून ठेवण्यासाठी शरीर- चरबी, स्नायू आणि आकारमान यांचे गुणोत्तर जास्त ठेवणे महत्वाचे असते. त्यामुळे तुम्हाला हालचाल करायला अधिक सोपे जाते. जेव्हा आपण अर्धा किलो वजन घटवतो, तेव्हा आपल्या गुडघ्यांवर पडणारे दोन किलो वजन कमी करत असतो. शरीरातील अतिचरबीचे प्रमाण, विशेषत: पोटावरील चरबीचे अतिप्रमाण खूपच त्रासदायक ठरते. त्यामुळे ऑस्टिओऑर्थरायटिसची लक्षणे अधिकच गंभीर बनून जातात, असे ब्रिटिश डाएटेटिक असोसिएशनच्या नोंदणीकृत डाएटिशियन स्यू बेईक सांगतात.

व्यायाम :

व्यायाम केल्यामुळे सांधेदुखीचा त्रास आणखीच वाढतो, असा बहुतेक लोकांमध्ये गैरसमज आहे. परंतु सांध्याभोवतीचे स्नायू बळकट करणे खूपच महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर अशावेळी तर सांध्याभोवतीचे स्नायू बळकट केल्याने सांध्यांवर पडणारा ताण कमी होतो, असे ब्रिटनच्या वेलिंग्टन रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक हिप सर्जन जिल्स स्टाफर्ड सांगतात. उदाहरणार्थ : तुमच्या स्नायूंचा बळकटपणा आणि हालचाली याचे योग्य कार्यात्मक प्रमाण ठेवून नितंबाच्या समस्येतून मार्ग काढता येऊ शकतो. यासाठी उकड बसून फुप्फुसांचा व्यायाम आणि वजन उचलण्यासारख्या हलक्या वजनाच्या डम्बेल्सचा व्यायाम करण्याची स्टाफर्ड शिफारस करतात.

तुमच्या दिनचर्येत बदल करा :

जेव्हा आपण व्यायामाचा विचार करतो, तेव्हा त्यात वैविध्य असणे खूपच महत्वाचे आहे. हाडांची घनता आणि बळकटपणा टिकवून ठेवण्यासाठी ह्रदयावर प्रभाव टाकणारे आणि प्रभाव न टाकणारे व्यायाम संमिश्र स्वरुपात करणे अत्यंत फलदायी ठरते, असे लॉरा जेमीसन सांगतात. ( या व्यायामाचे टेक्निक शिकून घेण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे. ) चांगली गतीशीलता टिकवून ठेवण्यासाठी योगा उपयुक्त ठरू शकतो, मात्र त्यासोबतच अन्य व्यायामांच्या प्रकाराची सांगडही घालावी, असा सल्ला जेमीसन देतात. अतिस्ट्रेचिंगच्या दुष्परिणामांबद्दल जेमीसन इशाराही देतात. अतिस्ट्रेचिंग केल्यामुळे सांधे त्यांची नैसर्गिक शारीरिक अवस्थेत जाऊ शकतात. त्यामुळे सांधे आणि सांध्याभोवतीच्या रचनेला हानी पोहोचू शकते, असे जेमीसन सांगतात.

मेडिटेरियन आहार घ्या :

अलिकडेच झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, चरबीयुक्त मांस आणि मांसाची उत्पादने, चरबीयुक्त डेअरी पदार्थ, केक्स, बिस्किट्स, बटर आणि नारळाच्या तेलामध्ये पचायला अवघड जाणारे सॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. अशा आहाराच्या सेवनामुळे गुडघे आणि नितंबातील लवचिक व नरम हाडे दुबळी करतात, त्यामुळे कुशिनिंगची हानी होऊ शकते किंवा ती नाहीशी तरी होऊ शकते, असे बेईक सांगतात. त्यामुळे त्याऑलिव्ह किंवा सरसोचे तेल, भरपूर फले, भाजीपाला,कडधान्य, शेंगदाणे, बेदाने असा मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या आहाराची शिफारस करतात. ओमेगा-३ फॅट्स दाह व सूज प्रतिबंधक असल्यामुळे दर आठवड्याला तेलकट मासे सेवन करावे, तुमच्या शरीरातील डी जीवनसत्वाच्या प्राणाकडेही लक्ष द्यावे. डी जीवनसत्वे तुमच्या हाडांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. जगातील प्रत्येक पाचमधील एका व्यक्तीमध्ये डी जीवनसत्वाचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.

चांगले पोश्चरही महत्वाचे :

चांगल्या पोश्चरचा अवलंब करणेही सांध्याच्या समस्या टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, जेमीसन सांगतात. तुम्ही तुमच्या पाठीची विशेष काळजी घेणे तर खूपच महत्वाचे आहे. पाठीचा मणका किंवा डिस्क्स बदलणारी शस्त्रक्रिया अद्याप तरी जगाच्या पाठीवर अस्तित्वात नाही. व्यायाम करतेवेळी आणि सर्वसामान्य हालचाली करताना योग्य आणि पुरक पादत्राणे घालणेही तितकेच महत्वाचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा