एसआरए योजनेंतर्गत आता देणार 300 चौरस फुटाचे घरः जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

0
78
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 चौरस फुटांऐवजी आता 300 चौ.फुटांचे घर देणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.

ठाणे येथे 8 एप्रिल 2016 पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यालय सुरु झाल्यापासून आतापर्यंत 19 प्रस्ताव नव्याने प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रकल्पांनाही 300 चौ. फू. लागू होणार आहे. ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन योजनेस विकासकांकडून आवश्यक प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,  असे आव्हाड म्हणाले.

थकबाकीदार विकासकांवर एफआयआरः  ‘म्हाडा’च्या पुनर्विकास योजनांमध्ये सहभागी असलेल्या ज्या विकासकांकडे थकबाकी आहे त्या सर्व थकबाकीदार विकासकांविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. विकासकांमार्फत भाडे अदा करण्याबाबत दिरंगाई व अनियमितता करणे आणि थकित रकमेचा भरणा न करणेबाबत त्यांना म्हाडा अधिनियम 1976 च्या कलम 95 अ(3) नुसार  सक्तीच्या निष्कासनाची कारवाई करून संक्रमण गाळे ताब्यात घेण्यात येतील अशा आशयाच्या नोटीस यापूर्वीच त्यांना बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसला विकासकांचा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने विकासक करीत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पास काम थांबवा नोटीस देण्यात आल्या आहेत. असेही आव्हाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा