कोरोनाची धास्तीः राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारीच गुंडाळणार

0
37
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  राज्यात कोरोनाचे १५ रूग्ण आढळल्यामुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवता यावे आणि लोकांना दिलासा देता यावा म्हणून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज शनिवार दि.14 मार्चपर्यंत चालेल. यात अर्थसंकल्पावरील चर्चा, विरोधी पक्षाचा प्रस्ताव, अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा व मतदान, विनियोजन विधेयक आणि शासकीय कामकाज होईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानसभेत तसेच विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.

विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत समितीने विचारविनिमय करुन गुरुवार दि.12 ते शनिवार दि.14 मार्च 2020 पर्यंतचे सभागृहाचे कामकाज ठरवण्यात आले, असे परब म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा